Coronavirus : First time corona patient paralysed covid attacks on immune system rare condition
Coronavirus : चिंताजनक! कोरोनाग्रस्त रूग्णात पहिल्यांदाच दिसला 'हा' गंभीर बदल, जगभरातील डॉक्टर हैराण..... By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 11:03 AM1 / 11कोरोना व्हायरसने मनुष्याच्या शरीरात एक नवीन कंडीशन तयार केली आहे. ब्रिटनमध्ये एका ५७ वर्षीय कोरोना रूग्ण या अजब समस्येसोबत झगडत आहे. जगातली ही पहिली अशी केस आहे ज्यात कोरोना रूग्णाला पॅरालिसिसचा अटॅक आला असेल. या व्यक्तीच्या हातांना लकवा मारलाय.2 / 11डेली मेलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसारस, ब्रिटनमध्ये राहणारा ५७ वर्षीय व्यक्ती १३ एप्रिलला हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. त्याचे दोन्ही हात काम करत नव्हते. स्टॅंडर्ड प्रोसीजरनुसार त्याची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. तो पॉझिटिव्ह निघाला आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.3 / 11तीन दिवसांनंतर त्याची स्थिती आणखी जास्त खराब झाली. आता तो ना श्वास घेऊ शकत होता ना काही खाऊ शकत गिळंकृत करू शकत होता. त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. 4 / 11नंतर टेस्ट केल्यावर समजलं की, त्याला गिलेन बारे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजार आहे. हा एकप्रकारचा ऑटोइम्यून आजर आहे. जो दरवर्षी साधारण १५०० ब्रिटीश नागरिकांना होतो.5 / 11सामान्यपणे इम्यून सिस्टम शरीरावर हल्ला करणाऱ्या व्हायरसला आणि बॅक्टेरियाला मारतं. त्यांच्याशी लढा देतं. पण गिलेन बारे सिंड्रोममध्ये शरीराचं इम्यून सिस्टम आपल्याच नर्वस सिस्टमवर हल्ला करू लागतं. 6 / 11हे मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या आजूबाजूच्या नर्वस सिस्टमच्या नसांना निकामी करू लागतं.नसा निष्क्रीय झाल्यावर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना लकवा मारतो. ही स्थिती फार घातक असते. याने माणसाचा जीवही जाऊ शकतो.7 / 11सामान्यपणे गिलेन बारे सिंड्रोम श्वास प्रणालीवर हल्ला करून शरीराच्या त्या भागाला निष्क्रीय करतो. पण कोरोना व्हायरसने पीडित रूग्णाच्या केसमध्ये हा मेंदूपासून ते पाठीच्या कण्याच्या शेवटापर्यंत हल्ला करत आहे.8 / 11कोरोनाने ग्रस्त या रूग्णावर या विचित्र आजाराच्या हल्ल्याने ब्रिटीश वैज्ञानिक आणि डॉक्टर हैराण झाले आहेत. याचा रिपोर्ट ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालाय.9 / 11रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, जेव्हा रूग्ण हॉस्पिटलमध्ये आला होता तेव्हा तो फारच मुश्किलीने उभा होऊ शकत होता. त्याच्या मांसपेशी कमजोर झाल्या होत्या. 10 / 11सकाळी तर तो चालूही शकत नव्हता. जेव्हा डॉक्टरांना समजलं की, रूग्णला गिलेन बारे सिंड्रोम आहे तेव्हा त्यांनी जगभरातील डॉक्टरांना संपर्क केला.11 / 11काही तासांमध्येच समजलं की, जेव्हा हा रूग्ण या अजब आजारासोबत लढत होता, तेव्हाच जगभरातील आणखी ८ रूग्णही याच आजाराने ग्रस्त झाले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications