CoronaVirus : Has coronavirus killed flu influenza cases nosedive by 98 percent
पॉझिटिव्ह बातमी! कोरोनामुळे नष्ट होतोय 'हा' जीवघेणा आजार; रुग्णांमध्ये मोठी घट, तज्ज्ञांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 12:55 PM1 / 7जगभरातील तज्ज्ञांनी धोक्याची सुचना दिली आहे. यानुसार कोरोना व्हायरस आणि फ्लू एकत्र उद्भवल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत एक सकारात्मक बाब समोर आली आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या फ्लूचा प्रभाव कमी होताना दिसून येत आहे. काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे फ्लूच्या रुग्णांमध्ये कमतरता दिसून येत आहे.2 / 7जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्विलांस डेटामधून समोर आलेल्या माहितीनुसार फ्लूच्या रुग्णांमध्ये कमतरता आढळली असून आता वैश्विक स्तरावर मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी फ्लूच्या रुग्णांमध्ये ९८ टक्के घट झाली आहे. ऑस्ट्रेलियात या वर्षी एप्रिलमध्ये फ्लू च्या १४ केसेस समोर आल्या होत्या. 3 / 7मागच्या वर्षी हा आकडा ३६७ होता. म्हणजेच फ्लूच्या रुग्णांमध्ये ९६ टक्के झाली. ऑस्ट्रेलियामध्ये जूनमध्ये फ्लू या आजाराचा कहर असतो. यावर्षी या आजाराचा उद्रेक तेवढ्या प्रमाणात झाला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार एंफ्लूएंजा व्हायरस म्हणजेच फ्लूने दरवर्षी ५ लाख लोकांचा मृत्यू होतो. 4 / 7लिवरपूल विद्यापिठातील व्हायरस तज्ज्ञ प्राध्यापक जेम्स स्टीवार्ट यांनी सांगितले की इम्यून सिस्टीम संक्रमण झाल्यानंतर सक्रिय होते. त्यानंतर व्हायरसला नष्ट करते. यादरम्यान शरीरात जर कोणत्या इतर व्हायरसचा प्रवेश झाला तर कोरोनाच्या संक्रमणाने विकसित झालेल्या इम्यूनिटीमुळे फ्लू या आजाराचा व्हायरस जास्त काळ टिकू शकत नाही. 5 / 7सेंट जॉर्ज युनिव्हर्सिची ऑफ लंडनच्या वायरोलॉजिस्ट एलिसाबेट्टा ग्रोपेल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरस परजीवी असतात. एकदा व्हायरसने व्यक्तीच्या पेशींमध्ये प्रवेश केल्यानंतर शरीरात असलेल्या इतर व्हायरसला नष्ट करतात किंवा नवीन व्हायरसला प्रवेश करण्यापासून रोखतात.6 / 7चिलीमध्ये यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या काळात फ्लूचे जवळपास १२ केसेस समोर आल्या होत्या. मागच्या वर्षी याच कालावधीत जवळपास ७ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेतही फ्लू या आजाराच्या रुग्णांमध्ये ९९ टक्के घट पाहायला मिळाली. 7 / 7ब्रिटेनमध्ये मार्चपासून आतापर्यंत फ्लू च्या ७६७ केसेस समोर आल्या होत्या. मागच्या वर्षी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत ७ हजार रुग्ण समोर आले होते. काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लूच्या रुग्णांमध्ये झालेली घट यामागची कारणं जाणून घेण्यासाठी अधिक संशोधन केलं जाणं गरजेचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications