शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: कोरोनावरील उपचारातील या घरगुती उपायांमुळे अजून वाढतो धोका, डॉक्टरांनी दिला असा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 5:22 PM

1 / 9
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केल्याने देशात भीतीचे वातावरण आहे. कोरोनापासून बचावासाठी लोकांकडून आपापल्या पातळीवर विविध उपाय केले जात आहेत. त्यात कोरोना विषाणूपासून बचावासाठी वाफ घेण्याचा उपाय मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. मात्र हा उपाय परिणामकारक आहे की त्याचे काही अपाय आहेत, याची माहिती युनिसेफ इंडियाने ट्विटरवरून दिली आहे.
2 / 9
कोरोनाला रोखण्यात वाफ घेणे हे उपयुक्त ठरू शकते याबाबत कुठल्याही प्रकारचे पुरावे सापडलेले नाहीत. तसेच डब्ल्यूएचओनेही अशाप्रकारचा कुठलाही सल्ला दिलेला नाही, असे युनिसेफडे दक्षिण आशियातील रीजनल अॅडव्हायझर आणि चाइल्ड हेल्थ एक्स्पर्ट्स पॉल रटर यांनी सांगितले.
3 / 9
उलट वाफ अधिक प्रमाणावर घेतल्याने त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. सतत वाफ घेतल्याने गळा आणि फुप्फुसामधील नळीतील टार्किया आणि फेरिंक्स जळू शकतात. त्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते.
4 / 9
या नळीचे नुकसान झाल्याने लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर विषाणू सहजपणे तुमच्या शरीरात दाखल होऊ शकतो. वाफ घेण्यामधील दुष्परिणाम जाऊन घेतल्या शिवाय त्याचा वापर करणाऱ्यांना सावध करण्यासाठी युनिसेफ इंडियाने ही माहिती दिली आहे.
5 / 9
सोशल मीडियावरील अन्य एका दाव्यानुसार गरम पाणी आपल्या गळ्याला चांगले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कोरोना विषाणू हा नाकामधील पॅरानसल सायनसमध्ये तीन ते चार दिवस राहतो. ३ ते ८ दिवसांनंतर तो फुप्फुसांमध्ये पोहोचतो आणि श्वसनाची समस्या वाढवतो. त्यामुळे गरम पाणी पिऊन त्याला संपवता येणार नाही. त्यापेक्षा ४० डिग्रीपर्यंतच्या उष्ण पाण्याची वाफ घेणे अधिक योग्य ठरेल. कारण ही वाफ पॅरानसल सायनसपर्यंत पोहोचते.
6 / 9
तज्ज्ञांच्या मते वाफ घेण्याबाबत लोकांच्या मनात चुकीच्या पद्धतीने असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. दुसरीकडे ही वाफ मानवी फुप्फुसामधील अंतर्गत लेयर्सला खराब करू शकते.
7 / 9
सतत एका आठवड्यापर्यंत वाफ घेण्याचा उपाय अशास्त्रीय आहे. अनेक रुग्णांना कोरोनापेक्षा वाफ घेतल्याने अधिक त्रास झाल्याचे दिसून आले. अशास्त्रीय पद्धतीने घेतलेली वाफ गळा आणि फुप्फुसामधील वायूमार्गाला नुकसान पोहोचवू शकते, ही बाब धोकादायक आहे, असे डॉक्टर सत्यनारायण मैसूर यांनी सांगितले.
8 / 9
तसेच वाफ घेताना पाण्यामध्ये तेल, युकालिफ्टस ऑईल आणि बाम मिसळतात. असे करणेसुद्धा धोकादायक आहे. हे प्रकार मेंदूसाठी हानिकारक ठरू शकतात, असे सेंट जॉन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे एचओडी आणि प्रा. डॉ. थॉमस मॅथ्यू यांनी सांगितले.
9 / 9
कोरोनाकालात अनेक अफवा लोकांचा गोंधळ उडवून देत आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdocterडॉक्टर