Coronavirus : How covid 19 virus enters in your body infect you api
Coronavirus : कोरोना व्हायरस शरीरात कसा शिरतो आणि इन्फेक्ट करतो? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया... By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 2:02 PM1 / 11कोरोना व्हायरस कोविड-19 किंवा SARS-CoV-2 ने आतापर्यंत जगातील. 3.32 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना आपलं शिकार केलं आहे. 14 हजार 587 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे 6 कोरोना व्हायरस जगात आहेत, जे मनुष्यांच्या शरीरावर हल्ला करून चुकले आहेत. यातील चार सामान्य सर्दीचे आहेत. दोनने SARS आणि MERS आउटब्रेक केला होता. अशात हा व्हायरस आपल्या शरीरात कसा शिरतो हे जाणून घेतलं पाहिजे...(All Images Credit : aajtak.intoday.in)2 / 11कोरोना व्हायरस हा तेलकट लिपिडच्या बुडबुड्याच्या आत असतो. या बुडबुड्याला चारही बाजूने प्रोटीन आणि लिपिड्सचा थर असतो. याच थरावर प्रोटीनचे काटे निघाले आहेत.3 / 11कोरोना व्हायरस आपल्या नाकातून, तोंडातून आणि डोळ्यांच्या माध्यमातून शरीरात शिरतो. त्यानंतर शरीरातील कोशिकांपर्यंत जातो. मनुष्यांच्या शरीरातील कोशिका ACE 2 नावाचं प्रोटीन निर्माण करतात. कोरोनाचे काटे ACE 2 प्रोटीनसोबत जुळतात.4 / 11त्यानंतर कोरोना व्हायरसचा तेलकट बुडबुडा फुटतो. तो कोशिकांच्या बाहेरील थराला मोकळं करतो. नंतर लिपिडमधील कोरोना व्हायरसचा स्ट्रेन किंवा RNA आपल्या कोशिकांमध्ये शिरतो.5 / 11कोरोना व्हायरसचा जीनोम आपल्या शरीरातील कोशिकांमध्ये एक निगेटीव्ह व्हायरल प्रोटीन तयार करणं सुरू करतं. यासाठी आपल्या कोशिकांमधून तो ऊर्जा घेतो. जेणेकरून शरीरातच नवीन कोरोना व्हायरस निर्माण करता यावे.6 / 11हळूहळू कोरोना व्हायरससारखे काटे आपल्या शरीराच्या कोशिकांमध्ये विकसित होऊ लागतात. म्हणजे आपल्या कोशिका कोरोना व्हायरससारख्या होऊ लागतात. नंतर त्या तुटून नव्या कोरोना व्हायरसला जन्म देऊ लागतात.7 / 11त्यानंतर मनुष्याच्या शरीरातच सुरू होते कोरोना व्हायरसची अॅसेम्ब्लिंग. म्हणजे व्हायरसचे नवीन RNA शरीरात पसरू लागतात. नवीन व्हायरस तयार होतात.8 / 11मनुष्याच्या शरीरातील संक्रमित प्रत्येक कोशिका लाखो व्हायरस तयार करू शकते. शेवटी शरीरातील कोशिका मरू लागतात. नंतर हळूहळू व्हायरस फुप्फुसात पोहोचून ऑक्सिजन स्वच्छ करण्याची प्रक्रिया थांबवतो.9 / 11अशात आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती व्हायरससोबत लढते. तेव्हा आपल्याला ताप येतो आणि जेव्हा स्थिती गंभीर होते तेव्हा आपली इम्यून सिस्टीम आपल्या फुप्फुसाच्या कोशिकांवर हल्ला करतं. याने फुप्फुसं बाधित होतात. या प्रक्रियेत कफ तयार होऊ लागतो. हा कफ म्हणजे मारल्या गेलेल्या संक्रमित कोशिका असतात. त्यामुळेच श्वास घेण्यास अडचण येते. यातच अनेकांचा मृत्यू होतो.10 / 11खोकल्याने किंवा शिंकल्याने फुप्फुसातून मारल्या गेलेल्या संक्रमित कोशिका पाणी किंवा थूंकी किंवा कफाच्या माध्यमातून बाहेर येतात. जे काही तासांपासून काही दिवसांपर्यंत बाहेरील वातावरणात जिवंत राहतात. 11 / 11भविष्यात असं होऊ शकतं की, कोरोना व्हायरसवर काही उपाय सापडेल. पण सध्या तरी यावर काहीही औषध नाही त्यामुळे यापासून बचावासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications