CoronaVirus : How Lockdown can also cause a virus infection myb
CoronaVirus : लॉकडाऊनमध्येही 'या' कारणामुळे होऊ शकतं व्हायरसचं इन्फेक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 9:49 AM1 / 10कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आत्तापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांना संक्रमण झाले आहे. सोशल डिस्टेंसिंगमुळे बचाव केला जाऊ शकतो. अनेक लोक लॉकडाऊनचं पालन करत आहेत. पण घरगुती वापरातील गोष्टी विकत घेण्यासाठी लोक किराणामालाच्या दुकानात जातात तेव्हा इन्फेक्शन होऊ शकतं. 2 / 10 तुम्ही जरी लॉकडाऊचे पालन करत असाल तरी काही कारणासाठी बाजारात किवा किराणामालाच्या दुकानात जाताना जर संक्रमित व्यक्तीशी संपर्क आल्यास तुम्हालाही लागण होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या इन्फेक्शनपासून कसं दूर राहता येईल याबाबत सांगणार आहोत.3 / 10भाज्या घेण्यासाठी किेंवा किराणामालाच्या आवश्यक सामानाची खरेदी करण्यासाठीच फक्त घराबाहेर पडा. घरात जीवनावश्यक वस्तू जास्तीच्या आणून ठेवा. जेणेकरून तुम्हाला सतत बाहेर पडावं लागणार नाही. 4 / 10सामान खरेदीसाठी जास्त असताना लोकांपासून लांब रहा. दुकानदाराला सामानाचे पैसै देताना कार्ड किंवा हार्ड कॅश स्वरुपात देऊ नका. डिजीटल पेमेंट करण्याला प्राधान्य द्या. कारण कोरोना संक्रमित व्यक्ती दुकानात आल्यास आणि पैशांची देवाण-घेवाण केल्याने त्यामार्फत कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता असते. 5 / 10व्हायरस काही ताासांपर्यंत प्लास्टिक वर राहू शकतो. त्यासाठी पॅकेड फूडचा वापर करणं टाळा.बाजारातून घरी आल्यानंतर स्वच्छ धुवा. 6 / 10खरेदी करत असताना जे सामान तुम्हाला घ्यायचं आहे. त्यालाच हात लावा. दुकानात मोबाईलचा वापर करू नका. तसंच वापर केल्यास घरी आपल्यानंतर मोबाईल सॅनिटाईज करा.7 / 10घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवा. हात धुण्यासाठी साबणाचा वापर केल्यास उत्तम ठरेल. बाहेरून आल्यानंतर थेट घरातील कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका.8 / 10तुम्हाला जर संक्रमण झाल्याची लक्षणं जाणवत असतील तर स्वतःची काळजी घ्या. डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. कारण दुर्लक्ष केल्यास तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याला धोका असू शकतो.9 / 10तुम्हाला जर संक्रमण झाल्याची लक्षणं जाणवत असतील तर स्वतःची काळजी घ्या. डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. कारण दुर्लक्ष केल्यास तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याला धोका असू शकतो.10 / 10तुम्हाला जर संक्रमण झाल्याची लक्षणं जाणवत असतील तर स्वतःची काळजी घ्या. डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. कारण दुर्लक्ष केल्यास तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याला धोका असू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications