CoronaVirus How to order drdo 2dg anti covid 19 drug from dr reddy here is the answer
CoronaVirus : कोरोना रुग्णांसाठी असे ऑर्डर करा DRDOचे 2DG औषध; वापरासंदर्भात DCGI नं दिले महत्वाचे निर्देश By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 4:38 PM1 / 10आपल्याला माहीतच आहे, की DRDO ने विकसित केलेले 2DG औषध हे कोरोनावरील उपचारात कामी येत आहे. हे ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज' औषध एका पाउचमध्ये पावडर स्वरुपात आहे आणि ते पाण्यासोबत घेतले जाऊ शकते.2 / 102-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी)च्या क्लिनिकल परीक्षणात दिसून आले आहे, की हे औषध घेतल्यास रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळते.3 / 10याच बरोबर, या औषधाने रुग्णही लवकर बरे होतात. तर जाणून घेऊया, कोरोना रुग्ण DRDO चे 2DG औषध कशा पद्धतीने ऑर्डर करू शकतात.4 / 10कोरोनाग्रस्त रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि प्रिस्क्रिप्शननुसार 2डीजी औषध दिले जाऊ शकते.5 / 10रुग्ण अथवा रुग्णाचे नातलग या औषधासाठी संबंधित रुग्णालयाला हैदराबाद येथील 'डॉ. रेड्डी लॅब'सोबत ई-मेलच्या सहाय्याने संपर्क साधण्यास सांगू शकता.6 / 102DG च्या वापरासंदर्भात DCGI नं दिले असे निर्देश - 2DG औषधाला रुग्णालयातील कोरोना बाधितांच्या उपचारात, देखभालीच्या मानकानुसार, एका सहायक थेरपीच्या स्वरुपात आपात्कालीन वापरासाठी मुंजुरी देण्यात आली आहे. 7 / 10मध्यम ते गंभीर कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त 10 दिवसांच्या अवधीकरिता डॉक्टरांकडून 2DG औषध लवकरात लवकर निर्धारित केले जावे. 8 / 10अनियंत्रित मधुमेह, गंभीर हृदय रोग, एआरडीएस, गंभीर यकृत आणि कमकुवत किडनी असलेल्या रुग्णांचे अद्याप 2डीजीसोबत अध्ययन करण्यात आलेले नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी. 9 / 102DG औषध गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आणि 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांना देऊ नये.10 / 102DG च्या वापरासंदर्भात DCGI चे महत्वाचे निर्देश - आणखी वाचा Subscribe to Notifications