शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाला रोखण्यासाठी औषधांपेक्षा, स्वयंपाकघरातील 'हे' मसाले ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 6:04 PM

1 / 10
कोरोना व्हायरसची लागण होत असलेले रुग्ण सर्वच ठिकाणी वाढत आहेत. हा धोका कमी करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. वैयक्तीक पातळीवर स्वच्छता बाळगण्यासह रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही घरच्याघरी स्वयंपाकघरातील काही उपायांचा वापर करून तुम्ही स्वतःला कोरोनापासून लांब राहू शकता.
2 / 10
भारतीय आहारात मसाल्यांना खूप महत्व आहे. मसाल्यांचा वापर करून तुम्ही कोरोनापासून लांब राहू शकता. मसाल्यांच्या औषधी गुणधर्मांबद्दल सांगणार आहोत. रोजच्या जंक फुड, झोपेची कमतरता अशा अनियमीत जीवनशैलीमुळे कोणतेही आजार लगेच अटॅक करतात. पण आहारात या मसाल्यांचा समावेश करून तुम्ही स्वतःला आजारांपासून लांब ठेवू शकता.
3 / 10
पुदिना : पुदिना सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवल्यास गुणकारी ठरतो. सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.
4 / 10
तुळस : तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म आहे. कोणतीही सम़स्या उद्भवल्यास तुळशीचा काढा गुणकारी ठरतो. पोटात जळजळ, पोटदुखी, गॅस, ब्लोटींग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो. तुळशीची पानंही अँटी बॅक्टेरिअल असतात. जी बॅक्टेरियाची वाढ रोखतात. ज्यामुळे इन्फेक्शनवरील उपचाराला मदत मिळते.
5 / 10
लसूण : कच्चा लसुण खाल्ल्याने ब्लड प्रेशर व कोलेस्ट्रॉल वाढत नाही. शरीरातील रक्तदाब सुरळीत राहण्यासाठी लसणाच सेवन करणं गरजेचं आहे. लसणाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढते.
6 / 10
हळदः हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हळद नियमित पोटात गेल्यामुळे अनेक आरोग्य समस्या तुमच्यापासून दूर राहू शकतात. हळदीत एंटी बॅक्टेरिअल,एंटी फंगल गुण असतात. हळदीतील गुणकारी घटकांमुळे अल्झामर रूग्णांची स्मरणशक्ती पुन्हा सुधारण्यास मदत होते. मेंदूचे कार्य सुधारते आणि मेंदूला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. पचनक्रिया बिघडली असल्यास कच्ची हळद फायदेशीर ठरते. कारण कच्ची हळद पचनक्रिया सुरळीत करते.
7 / 10
हिंग : हिंगाचा वापर फोडणीत आवर्जून केला जातो. पोटदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी याकरिता हिराहिंग किंवा नेहमीच्या हिंगाचा गरम गरम दाट लेप उत्तम काम करतो. चांगल्या दर्जाचा हिंग हा उत्तम वातनाशक आहे. हिंगाचा कणभर खडा मिठाबरोबर घेतला की कसलेही अजीर्ण दूर होते. पोटदुखी, पोटफुगी, जंत, अन्न कुजणे या तक्रारींत हिंग, मीठ, लसूण व गरम पाणी असे मिश्रण नियमित घ्यावे. त्याासाठी आलं आणि हिंगाचा रस घ्या.
8 / 10
मिरची : हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी६, लोह, कॅापर, पॅाटेशियम, प्रथिने आणि कर्बोदकाचा समावेश असतो. ज्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणं गरजेचे आहे. जर तुमची शुगर लेव्हल वाढली असेल तर ती कमी करण्यास मदत होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा मिरची फायदेशीर आहे.
9 / 10
वेलची : वेलचीचा वापर गोड पदार्थांमध्ये तर कधी पुलाव, सारण तयार करताना केला जातो. वेलची सुगंध काही जणांना खूप आवडतो. वेलचीच्या सेवनाने रक्तविकार, तहान, मळमळ, उचकी, कोरडा खोकला, मूत्रविकार, डोळय़ांचे विकार, केसांचे व डोक्याचे विकार दूर होतात. वेलचीचे दाणे भाजून त्याचे चूर्ण घेतल्यास उचकी व उलटी थांबते. वेलची खाल्ल्याने अन्नपचन व्यवस्थित होते.
10 / 10
या मसाल्यांचा आहारात समावेश करून तुम्ही आरोग्य चांगलं ठेवू शकता. त्यासाठी जेवणात जास्तीत जास्त मसाल्यांचा वापर करा.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य