शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: चीनमध्ये कोरोनाचा फैलाव कमी कसा? वुहानमध्ये अडकलेल्या तरुणाने सांगितलं नेमकं कारण

By बाळकृष्ण परब | Published: October 20, 2020 1:27 PM

1 / 7
जगभरात कोरोनाचा विषाणूचा फैलाव सातत्याने वाढत आहे. मात्र चीनमधील सरकारी आकडेवारीनुसार देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. पण इतर ठिकाणी कोरोना वाढत असताना चीनने असे काय केले ज्यामुळे हा जीवघेणा आजार नियंत्रणात आला असा प्रश्न जगाला पडला आहे. दरम्यान, चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा फैलाव सर्वोच्च पातळीवर असताना तिथे अडकलेल्या एका तरुणाने याबाबत माहिती समोर आणली आहे.
2 / 7
लंडनमध्ये राहणाऱ्या एका चिनी नागरिकाने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी चीनने केलेल्या उपायांची माहिती शेअर केली आहे. वुहानमध्ये कोरोनाचा फैलाव होत असताना हा तरुण पाच महिने तिथे अडकलेला होता.
3 / 7
आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वुहानमध्ये गेलेला ३१ वर्षांचा शी लू हा कोरोनाच्या फैलावामुळे वुहान येथे १४१ दिवस अडकला होता. इतर देशांच्या तुलनेत चीनने कोरोनाच्या या साथीचा चांगल्या पद्धतीने सामना केला, त्याचं कारण म्हणजे चीनमधील जनता ही आज्ञाधारक आहे आणि नियम पाळते, असे त्याने सांगितले. तसेच निर्बंध आणि स्वातंत्र्याबाबत होत असलेल्या चर्चेबाबत त्यांनी सांगितले की, जर कुणी वाचला नाही तर मानवाधिकारांना काही अर्थ उरणार नाहीत.
4 / 7
कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर वुहानमध्ये अत्यंत कठोर प्रतिबंध लादण्यात आलेले होते. शी लूच्या मते चिनी नागरिक आणि अन्य लोकांमध्ये सांस्कृतिक फरक आहे. चिनी नागरिक हे सरकारच्या नियमांचं खूप मोठ्या प्रमाणावर पालन करतात.
5 / 7
शी लू यांनी सांगितले की, जर चीनमध्ये कुठलाही नियम लागू झाला तर आम्ही त्याचं पालन करू, त्यांनी सांगतलं की, मास्क वापरण्याबाबतच्या नियमाचंही येथील लोकांनी काटोकोरपणे पालन केले. चीनमध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांनी नियमभंग केल्यास त्याची माहिती अधिकाऱ्यांना देतात. लॉकडाऊनदरम्यान, मीसुद्धा असेच केले, असेही शी लू यांनी सांगितले.
6 / 7
दरम्यान, अँटी मास्क आणि अँटी व्हॅक्सिनसारख्या मोहिमा सुरू झाल्या तर कोरोनाची तिसरी लाटसुद्धा येऊ शकते आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल. त्यांनी सांगितले की, लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर कोरोना एवढ्यावरच थांबणार नाही आणि पुन्हा चौथी लाट पुढच्या ऋतूत येईल.
7 / 7
शी लू हे जेव्हा जानेवारी महिन्यात चीनमध्ये गेले होते तेव्हा त्यांची पत्नी लंडनमध्येच राहिली होती. १४१ दिवस चीनमध्ये अडकल्यानंतर ते जुलै महिन्यात लंडनमध्ये परतले होते. ते गेल्या ७ वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहेत. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी वुहानमध्ये लावण्यात आलेले लॉकडाऊन हे जगातील सर्वात कडक लॉकडाऊन होते, असे सांगण्यात येते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय