coronavirus: घरी कोरोनाबाधित रुग्ण असल्यास स्वत:ला सुरक्षित ठेवत अशी घ्या त्याची काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 12:12 PM
1 / 14 सध्या देशात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहेत. मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाल्याने रुग्णालयातील बेड्स अपुरे पडत आहेत. त्यामुळे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. अशा परिस्थितीत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांची जाबबदारी वाढते. अशा कोरोनाबाधित रुग्णाची काळजी घेताना स्वत:ला सुरक्षित कसे ठेवायचे याची माहिती आज आपण जाऊन घेऊयात. 2 / 14 जर तुम्ही कोरोनाबाधित रुग्णाची देखभाल करत असाल तर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व औषधांची माहिती असणे आवश्यक आहे. रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावे. तसेच त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांना एका आठवड्यानंतर बरे वाटते. 3 / 14 अशा रुग्णांच्या आहाराची योग्य काळजी घ्या. त्यांना पातळ पदार्थ अधिक प्रमाणात पिण्यास द्या. तसेच रुग्ण पुरेसा आराम करेल याची खबरदारी घ्या. रुग्णासाठी आवश्यक सामानाची खरेदी करा. घरात रुग्ण असेल तर सामान ऑनलाइन मागवण्याचा प्रयत्न करा. 4 / 14 जर कोरोनाबाधित रुग्णाने कुठलाही प्राणी पाळला असेल तर त्याचीही काळजी घ्या. तसेच हा प्राणी रुग्णाच्या संपर्कात येणार नाही याची खबरदारी घ्या. 5 / 14 कोरोनाच्या रुग्णामधील गंभीर लक्षणांवर लक्ष द्या. जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत दुखत असेल. रुग्ण अंथरुणावरून उठू शकत नसेल तर अशी गंभीर लक्षणे दिसल्यावर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कुठलाही निर्णय घ्या. 6 / 14 रुग्णासोबत कुठल्याही प्रकारचा शारीरिक संपर्क ठेवू नका. कोरोना विषाणू हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने, रुग्णाचे ड्रॉपलेट्स आणि रुग्ण खोकल्यास किंवा शिंकल्यास वेगाने पसरतो. त्यामुले रुग्णापासून किमान सहा फुटांचे अंतर ठेवण्याची खबरदारी घ्या. 7 / 14 रुग्णाची देखभाल करणारी व्यक्ती निरोगी असली पाहिजे. तिला आधीपासून कुठल्याही प्रकारचा आजार असता कामा नये. तसेच तिच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असली पाहिजे. बाधित व्यक्ती पूर्णपणे आयसोलेट झाली पाहिजे. रुग्णासाठी एक खोली आणि बाथरूम असला पाहिजे. रुग्णाच्या खोलीच्या खिडक्या उघड्या असल्या पाहिजेत. त्यामुळे योग्य पद्धतीने व्हेंटिलेशन होत राहील. 8 / 14 घरी रुग्ण असेल तर बाहेरील व्यक्तीला घरी येऊ देऊ नका. विशेषकरून जे लोक आजारी असतील किंवा आजारी पडण्याची शक्यता असेल अशा लोकांना घरी न येण्याबाबत सांगा. तसेच तुम्ही स्वत: कोरोना रुग्णावर उपचार करत असाल तर स्वत:ही बाहेर जाण्याचे टाळा. 9 / 14 कोरोनाबाधित रुग्णाने त्याच्या खोलीमध्येच भोजन केले पाहिजे. तसेच त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने ग्लव्हज घालून रुग्णाची भांडी उचलली पाहिजेत. तसेच गरम पाण्याने साबण लावून धुतली पाहिजेत. तसेच देखभाल करणाऱ्या व्यक्तीने आपले ग्लास, कप, टॉवेल तसेच इतर कुठलीही वस्तू आजारी व्यक्तीसोबत शेअर करू नये. 10 / 14 कोरोनाबाधित व्यक्तीने घरातील इतर व्यक्तींशी बोलताना मास्क लावणे आवश्यक आहे. मास्क ड्रॉपलेट्सना अन्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्यापासून थांबवतो. तसेच संसर्ग होण्यापासूनही वाचवतो. देखभाल करणाऱ्या व्यक्तीने रुग्णाच्या खोलीत जाताना योग्य प्रकारे मास्क लावला पाहिजे. तसेच आपला मास्क वेळोवेळी बदलला पाहिजे. 11 / 14 रुग्णाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने वेळोवेळी आपले हात पाणी आणि साबणाने किमान २० सेकंदांपर्यंत चोळून स्वच्छ धुतले पाहिजेत. तसेच घरातील पृष्टभाग वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजेत. तसेच डोळे, नाक, तोंडाला हात धुण्याआधी स्पर्श करू नये. 12 / 14 रुग्णाच्या खोलीतून विषाणू नष्ट करण्यासाठी दररोज साबण आणि डिटर्जंटने स्वच्छता केली पाहिजे. यादरम्यान मास्क आणि ग्लव्ज योग्य पद्धतीने परिधान करा. वारंवार स्पर्श होणारे भागही चांगल्या पद्धतीने स्वच्छ करा. 13 / 14 रुग्णाची देखभाल करताना स्वत:मध्ये दिसणाऱ्या लक्षणांवरही लक्ष ठेवला पाहिजे. कोरोनाचा नवा स्ट्रेन हा खूप संसर्गजन्य आहे. तसेच कुणीही सहजपणे त्याची शिकार होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कुठलीही लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. 14 / 14 रुग्णाची देखभाल करताना स्वत:मध्ये दिसणाऱ्या लक्षणांवरही लक्ष ठेवला पाहिजे. कोरोनाचा नवा स्ट्रेन हा खूप संसर्गजन्य आहे. तसेच कुणीही सहजपणे त्याची शिकार होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कुठलीही लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. आणखी वाचा