coronavirus : Infect more obese fat high BMI heavy weight people api
coronavirus : लठ्ठ लोकांना कोरोनापासून जास्त सावध राहण्याची गरज, जाणून घ्या रिसर्च काय सांगतो! By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 4:38 PM1 / 9आतापर्यंत हा प्रश्न विचारला जात होता की, कोरोना व्हायरसची लागण वयोवृद्ध आजारी पडतील की तरूण? आता एक वेगळा प्रश्न जगभरातून विचारला जात आहे. प्रश्न हा आहे की, कोरोना व्हायरस धोका लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्यांना असतो का? तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर यूरोपच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस(NHS) नुसार, यूरोपमध्ये जेवढ्या कोरोनाच्या केसेस आढळल्या त्यातील दोन तृतीयांश लोक लठ्ठ आहेत. 2 / 9NHS नुसार, जर तुमच्या शरीरात प्रमाणापेक्षा जास्त चरबी असेल तर तुमचा बॉडी मास्क इंडेक्स जास्त आहे. तर तुमच्यासाठी कोरोना व्हायरस जास्त धोकादायक ठरू शकतो. यूरोपमध्ये कोरोना व्हायरसमुळे गंभीर रूपाने आजारी पडलेल्या लोकांमध्ये दोन तृतीयांश लोक लठ्ठ आहेत.3 / 9त्यासोबतच NHS ने हेही सांगितलं की, गंभीर रूपाने आजारी लोकांमध्ये 40 टक्के लोक 60 वयाखालील आहेत आणि लठ्ठ आहेत. एकट्या यूनायटेड किंगडममध्ये कोरोनाने संक्रमित एकूण रूग्णांमध्ये 63 टक्के ICU मध्ये आहेत. हे सर्व रूग्ण लठ्ठ आहेत किंवा जास्त बीएमआय असलेले आहेत.4 / 9गेल्या 24 तासात यूकेमध्ये एकाचवेळी साधारण 194 लोक ICU मध्ये भरती करण्यात आलेत. यातील साधारण 130 लोक शरीराच्या मानाने जास्त वजनी आहेत. कोविड-19 कोरोना व्हायरस अश लठ्ठ लोकांसाठी जास्त घातक ठर शकतो.5 / 9ICU मध्ये एकाचवेळी भरती 194 लोकांपैकी 139 रूग्ण पुरूष आहेत. म्हणजे साधारण 71 टक्के. तर 57 महिला भरती आहेत. म्हणजे 29 टक्के. या रूग्णांपैकी 18 रूग्ण असे असतात ज्यांना फुप्फुसांचा किंवा हृदयासंबंधी आजार असतो. म्हणजे लठ्ठपणामुळे झालेले आजार.6 / 9आधीही काही रिसर्चमधून हे सांगण्यात आलं आहे की, लठ्ठ लोकांना संक्रमणाचा धोका जास्त राहतो. सोबतच यांना फुप्फुसासंबंधी आजार होण्याचाही धोका अधिक राहतो. 7 / 9डॉक्टरांचं देखील हेच मत आहे की, लठ्ठ लोकांच्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती जास्त मजबूत नसते. कारण हे लोक फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असलेला आहार घेत नाहीत. त्यामुळे यांची इम्यून सिस्टीम कमजोर झालेली असते.8 / 9जास्त वजन असल्याने किंवा लठ्ठपणा असल्याने शरीराचं डायफ्रॉम आणि फुप्फुसांना फुगण्यास अडचण होते. म्हणजे मोठा श्वास घेण्यास अडचण येते. लठ्ठ लोकांना लवकर धाप लागते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील सर्व अवयवांपर्यंत पुरेसं ऑक्सिजन पोहोचत नाही.9 / 9अशा स्थितीत लठ्ठ लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक राहतो. यूकेत सध्या 6650 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 335 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात 3.50 लाखांपेक्षा जास्त लोकांना संक्रमण झालं आहे. 16 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications