Coronavirus: ‘या’ तीन प्रकारे वाढतंय कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या कशी जाणवतात लक्षणं? By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 7:48 PM1 / 11जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. भारतातही कोरोना रूग्णांची संख्या २ लाख ८० हजारांपर्यंत पोहचली आहे. या प्राणघातक आजारामुळे आतापर्यंत ८ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. 2 / 11कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याचा संसर्ग झालेल्या लोकांना ओळखणे. काही रुग्णांमध्ये कोरोना संक्रमणाची स्पष्ट लक्षणे दिसतात, काही लोकांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतरही कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.3 / 11फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिटय़ूट, गुरुग्राममधील न्यूरोलॉजीचे संचालक डॉ. प्रवीण गुप्ता म्हणाले की, कोरोना विषाणूची लागण एसीम्प्टोमॅटिक, प्रीसिम्प्टोमॅटिक आणि सीम्प्टोमॅटिक अशा तीन प्रकारे होते.4 / 11एसीम्प्टोमॅटिक रुग्ण असे आहेत ज्यांना कोरोना विषाणूची लागण आहे परंतु त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत म्हणजेच त्यांना खोकला, ताप येणे आणि श्वास घेण्यात अडचण यासारखे काही त्रास होत नाही. प्रीस्म्प्टोमॅटिक म्हणजे ज्यांना संसर्गानंतर काही दिवसांनंतर लक्षणे दिसतात. तर सीम्प्टोमॅटिकमध्ये ज्यांना ताप, वाहणारे नाक, खोकला यासारखे लक्षणे संक्रमित व्यक्तीमध्ये दिसतात5 / 11डॉ. प्रवीण गुप्ता म्हणाले की, लक्षणे नसलेल्या लोकांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. परंतु प्रत्यक्षात, हे लोक एसीम्प्टोमॅटिक नसून प्रीम्पोमेटोमॅटिक असतात, ज्यांच्या शरीरात दुखण्यासारखे सौम्य लक्षणेच दिसतात.6 / 11प्रीस्म्प्टोमॅटिक लोकांमध्ये लक्षणे दिसण्यापूर्वी ४८ तास आधी विषाणूचा प्रसार होण्यास सुरवात होते. असे लोक धोकादायक असतात कारण त्यांच्यात लक्षणे नसतात आणि ते कोणतीही खबरदारी घेत नाहीत. प्रीमिम्प्टोमॅटिक लोकांकडून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधिक आहे. 7 / 11यूएस सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल एँण्ड प्रिव्हेंशनने देखील एका अहवालात असे म्हटले आहे की प्री सीम्प्टोमॅटिक रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण आजारी पडण्यापूर्वीच संसर्ग पसरविण्यास सुरुवात करतात.8 / 11गंगाराम हॉस्पिटलमधील इम्यूनोलॉजी एँण्ड मायक्रोबायोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ.चंद वत्तल यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने असे विधान करण्यापूर्वी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याबाबत आम्हाला पुरावा हवा आहे. आतापर्यंत आलेले बहुतेक अभ्यास हे बहुतेक ऑनलाइन अभ्यास आहेत असं सांगितलं आहे.9 / 11डॉ. वत्तल म्हणाले, एसीम्प्टोमॅटिक रुग्णांना गंभीरपणे घेण्याची गरज आहे कारण आम्हाला त्यांच्या संपर्काची माहितीही नाही. अशा परिस्थितीत लोकांच्या संपर्कांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.10 / 11या आकडेवारीमुळे भारताच्या चाचणी प्रणालीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवळ लक्षणं असणाऱ्या लोकांची कोरोना विषाणूची चाचणी घेतली जाऊ शकते. १८ मे रोजी जारी करण्यात आलेल्या दुसर्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये असे म्हटले आहे की, 'उच्च जोखीम एसीम्प्टोमॅटिक आणि कोरोना विषाणूचा थेट संपर्क असलेल्या लोकांची देखील तपासणी केली पाहिजे.11 / 11भारतातील तज्ज्ञांच्या मते, आयसीएमआरने आता त्याच्या चाचणी धोरणात सुधारणा केली पाहिजे आणि नवीन गोष्टी लक्षात घेऊन अधिक चाचणी केली पाहिजे. आयसीएमआरच्या रिसर्च टास्कचे सदस्य आणि पीएचएफआयच्या एपिडेमिओलॉजीचे प्रमुख गिरीधर बाबू म्हणतात,असंख्य पुराव्यांवरून असे स्पष्टपणे दिसून आले आहे की एसीम्प्टोमॅटिक लोक कोरोना विषाणूचा प्रसार देखील करतात. केवळ १० टक्के एसीम्प्टोमॅटिक लोकांना लक्षणं दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications