CoronaVirus : know what is the cytokine therapy being used to treat covid 19 myb
कोरोनाला हरवण्यासाठी प्रभावी ठरू शकते 'सायटोकाइन थेरेपी'; 'या' राज्यात चाचणी सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 1:51 PM1 / 10कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी तसंच कोरोनाची लागण होऊ नये म्हणून नवनवीन औषधांवर आणि लसींवर प्रयोग सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी प्लाझ्मा थेरेपीने कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू होते. अनेक देशांमध्ये प्लाज्मा थेरेपीचा वापर करून रुग्णांना बरं केलं जात आहे. आता DGHC ने कोरोनाच्या उपचारांसाठी सायटोकाइन थेरेपीच्या चाचणीसाठी मंजुरी दिली आहे.2 / 10सायटोकाइन थेरेपीचं वेगळेपण असं आहे की, याद्वारे संक्रमणाच्या सुरुवातीच्या स्टेजपासूनच रुग्णाचे उपचार केले जाऊ शकतं. म्हणजेच या थेरेपीच्या वापरासाठी रुग्णाची स्थिती गंभीर होईपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. आज सायटोकाइन थेरेपीचा वापर कसा केला जातो याबाबत सांगणार आहोत. 3 / 10DGHC ने कर्नाटकातील बेंगलोरच्या एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलला न्यू ड्रग्स एंड क्लीनिकल ट्रायल रूल्स, 2019 नुसार सायटोकाइनच्या परिक्षणाची परवानगी दिली आहे. तज्ज्ञांनी वाढत्या कोरोना व्हायरसचे रुग्ण रोखण्यासाठी या थेरेपीवर ट्रायल सुरु केला आहे. या थेरेपीची पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. आता शेवटच्या ट्प्प्यापर्यंत सकारात्मक परिणाम दिसून आल्यास जून महिन्यांपर्यंत कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी या थेरेपीचा वापर केला जाईल.4 / 10सायटोकाइन थेरेपीचा वापर वयस्कर रुग्णांवर आधी करण्यात आला, अशा रुग्णांमध्ये ज्यांच्यात संक्रमणाची लक्षणं दिसायला सुरूवात झाली होती. (ICREST) चे डायरेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या थेरेपीचा वापर करून वयस्कर लोकांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवता येऊ शकते. 5 / 10जर गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यावर या थेरेपीचा वापर केला तर रोगप्रतिकारकशक्तीची ओव्हर रिएक्शन होऊ शकते. त्यामुळे बाहेरील हातापायांना सुज येणं, निमोनिया इतर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून या थेरेपीचा वापर सुरूवातीलाच करायला हवा. 6 / 10ही थेरेपी रुग्णाच्या शरीरात एका प्रकारचे खास प्रोटीन तयार करते. त्याला सायटोकाइंस असं म्हणतात. माणसाचे शरीर कोणत्याही व्हायरसला मारण्यासाठी इंटरफेरॉन केमेकिल रिलीज करते. पण कोरोना व्हायरसमुळे पेशी काम करू शकतं नाहीत म्हणून रुग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होत जाते7 / 10इंटरफेरॉन कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी ठरतात. या टेक्निकचा वापर करून साइटोकाइंसला इंटरमस्क्युलर इंजेक्ट केलं जाते. त्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती सुधारते आणि शरीर व्हायरसशी लढण्यासाठी तयार होतं. 8 / 10इंटरफेरॉन कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी ठरतात. या टेक्निकचा वापर करून साइटोकाइंसला इंटरमस्क्युलर इंजेक्ट केलं जाते. त्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती सुधारते आणि शरीर व्हायरसशी लढण्यासाठी तयार होतं. 9 / 10इंटरफेरॉन कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी ठरतात. या टेक्निकचा वापर करून साइटोकाइंसला इंटरमस्क्युलर इंजेक्ट केलं जाते. त्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती सुधारते आणि शरीर व्हायरसशी लढण्यासाठी तयार होतं. 10 / 10इंटरफेरॉन कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी ठरतात. या टेक्निकचा वापर करून साइटोकाइंसला इंटरमस्क्युलर इंजेक्ट केलं जाते. त्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती सुधारते आणि शरीर व्हायरसशी लढण्यासाठी तयार होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications