CoronaVirus : lessons life after coronavirus changes in people after coronavirus myb
CoronaVirus : कोरोनाच्या महामारीमुळे लोकांमध्ये झाले आहेत 'हे' बदल By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 6:17 PM1 / 10कोरोना व्हायरसमुळे सध्याचं वातावरण खूप बदललं आहे. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना घरी जास्तवेळ थांबावं लागत आहे. अनेकांचं बाहेर पडणं पूर्ण बंद झालं आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांची गैरसोय होत आहे. तर काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. पण तरीसुद्धा लॉकडाऊनमुळे समाजातील लोकांमध्ये सकारात्मक बदल घडून येत आहेत.2 / 10कोरोनाच्या भीतीमुळे सगळे लोक आपापल्या घरी आहेत. अनेकांची कार्यालयं बंद असल्यामुळे काम सुद्धा बंद आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये कोणते बदल होत आहेत याबाबत सांगणार आहोत.3 / 10कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मानसिकतेत बदल होताना दिसून येत आहे. लोक सध्या स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत आहेत. लोकांना घरी राहून जरी ताण- तणाव येत असला तरी हेल्दी राहण्याची सवय सुद्धा होत आहे.4 / 10लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला तरी सेविंग करून अनावश्यक खर्च टाळण्याची सवय लोकांना लागत आहे. 5 / 10जे लोक आपल्या आयुष्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत होते. त्यांचा आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. 6 / 10आधीच्या तुलनेत आता लोक जास्त स्वच्छता पाळताना दिसून येत आहेत. फास्ट फूड खाणं टाळून घरी तयार केलेल्या अन्नाचं लोकांना महत्व कळत आहे.7 / 10काही ठिकाणी लोक दिवसेंदिवस वाढत जात असलेल्या प्रदुषणामुळे त्रस्त होते. सध्या लॉकडाऊनमुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणावर कमी झालं आहे. परिणामी पर्यावरण सुद्धा स्वच्छ आहे.8 / 10व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नव्हता. तेच लोक आता जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देत आहेत. आपल्या प्रियजनांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करता येत आहे. बॉडिंग खूप चांगलं झालं आहे.9 / 10व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नव्हता. तेच लोक आता जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देत आहेत. आपल्या प्रियजनांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करता येत आहे. बॉडिंग खूप चांगलं झालं आहे.10 / 10(image credit : the commentator) आणखी वाचा Subscribe to Notifications