शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : लॉकडाऊनदरम्यान असं राहा मानसिक आणि शारीरीकदृष्ट्या फिट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 5:45 PM

1 / 12
कोरोना व्हायरसने जगभरात कहर केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण घरामध्ये बसून आहेत.
2 / 12
लॉकडाऊनदरम्यान स्वतःची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. घरी राहून मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कसं फिट राहायचं हे जाणून घेऊया.
3 / 12
काम नसेल आणि घरी बसून असू तर मनात अनेक विचार येतात. जास्त विचार करू नका. डोक शांत ठेवा. सकारात्मक गोष्टींवर चर्चा करा.
4 / 12
कामाच्या गडबडीत कुटुंबाला वेळ द्यायला मिळत नाही. मुलांसोबत मजा करा. मोकळेपणाने चर्चा केल्यावर छान वाटेल.
5 / 12
आपल्या आवडीचा छंद जोपासा म्हणजे मन प्रसन्न होईल. काहींना चित्र काढायला आवडत तर काहींना वाचायला आवडत यामुळे आनंद मिळेल.
6 / 12
व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यामुळे नियमित व्यायाम करा. म्हणजे काम करताना उत्साह वाटेल आणि शरीर सुदृढ राहील
7 / 12
गाणी ऐकायला सर्वांनाच आवडतं. प्रत्येकाच्या गाण्याची निवड ही वेगळी असते. तुमच्या आवडीची गाणी ऐका म्हणजे मूड फ्रेश होईल
8 / 12
आहार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे पोषक पदार्थांचा जेवणात समावेश करा. उपाशी पोटी झोपू नका.
9 / 12
पाणी हे शरीरासाठी गरजेचं आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या. डॉक्टरही जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात.
10 / 12
बुद्धिबळ, कॅरम यासारखे गेम सर्वांसोबत खेळा. मोबाईलवर ही विविध गेम खेळत येतात. ते खेळल्यावर बरं वाटेल तसेच थोडं रिलॅक्स होता येईल.
11 / 12
घरी बसून राहिल्याने कंटाळा येतो. व्हिडिओ कॉल किंवा कॉन्फरेन्स कॉलच्या मदतीने मित्र मैत्रिणीशी मनसोक्त गप्पा मारा आणि मस्त राहा
12 / 12
धावपळीत आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्दी खोकला यासारखा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न