शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : बापरे! डोळे आणि फुफ्फुसांनंतर आता कोरोना कानावर करतोय 'अटॅक'; ऐकण्याची क्षमता होतेय कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 9:51 AM

1 / 14
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लाखो लोकांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.
2 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांची चिंता वाढली आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
3 / 14
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना ब्लॅक फंगसचा देखील धोका आहे. तसेच संसर्गाचे हृदय, डोळे आणि फुफ्फुसांनंतर गंभीर परिणाम होत आहेत. यानंतर आता कोरोना कानावर अटॅक करत असल्याची धडकी भरवणारी माहिती मिळत आहे.
4 / 14
कान दुखणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कान जड होणे, घंटी किंवा शिटी वाजवल्यासारख्या आवाजाचा भास होणं अशा समस्या आता रुग्णांमध्ये आढळून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे.
5 / 14
कोरोनामुळे रुग्णांना नीट झोप देखील लागत नाही. डॉक्टरांच्या मते हा कोरोनाचा नवा स्ट्रेन ड़ेल्टा व्हेरिएंट असू शकतो. रुग्णांमध्ये सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस पाहायला मिळत आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे हा त्रास होतो.
6 / 14
कोरोना व्हायरस नाकाच्या माध्यमातून इम्यून सिस्टमवर अटॅक करतो. नाक आणि कान हे कनेक्टेड असतात. जे इन्फेक्शन नाकात असतं ते पुढे कानात जातं. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनने रिएक्शन होतं. कान डॅमेज होऊ शकतो.
7 / 14
किशनगड-रेनवालचे निवासी असलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना संक्रमण झाल्यानंतर एक महिन्यांनी अचानक कानाने ऐकू येणंच बंद झालं. याला मेडिकल भाषेत सडन सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस असं म्हटलं जातं. यासाठी रुग्णाला ऑक्सिजन थेरपी दिली जाते.
8 / 14
एसएमएस मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुधीर भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस कान आणि डोळ्यांवर थेट अटॅक करतो. नव्या स्ट्रेनमध्ये ताप येणं, पोट दुखणं, डायरिया, गॅस, उलटी, पाठदुखी, एसिडिटी, भूक न लागणं सारखी नवनवीन लक्षणं पाहायला मिळत आहेत.
9 / 14
रुग्णालयात दोन्ही कानांनी कमी ऐकू येत असलेले तसेच कमी दिसत असल्याची तक्रार घेऊन अनेक रुग्ण हे येत आहेत. रुग्णांना यामुळे बरं होण्यासाठी देखील अधिक वेळ लागत आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 14
वर्षभरानंतरही कोरोना पाठ सोडत नसल्याची धक्कादायक माहिती देखील आता समोर आली आहे. कोरोनातून बरं झाल्यावर देखील काही रुग्णांमध्ये लक्षणं आढळून आली आहेत. लँसेट जनरलच्या रिसर्चमधून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
11 / 14
रिपोर्टनुसार, कोरोना संक्रमित झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांमध्ये 12 महिन्यांनंतर देखील कोरोनाची काही लक्षणं आढळून येत आहेत. न्यूज एजन्सीनुसार, चीनच्या वुहानमध्ये 1276 रुग्णांवर हा रिसर्च करण्यात आला आहे.
12 / 14
तीन पैकी एका व्यक्तीला 12 महिन्यांनंतर देखील श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आहे. तर काही लोकांच्या फुफ्फुसाच्या तक्रारी आहे. ज्यांना कोरोनाचा अधिक संसर्ग झाला होता. त्यांना जास्त त्रास जाणवत आहे. तर अनेकांना थकवा जाणवू लागला आहे.
13 / 14
चीन-जपानच्या फ्रेंडशिप हॉस्पिटलचे प्रोफेसर बिन काओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत आमची रिसर्च टीम सर्वात मोठा रिसर्च करत आहे. रिसर्चमध्ये काही रुग्णांना बरं होण्यासाठी एका वर्षापेक्षा अधिक काळ लागत असल्याचं म्हटलं आहे.
14 / 14
कोरोनातून ठीक झाल्यानंतर सहा महिन्यांनी 68 टक्के रुग्णांमध्ये कमीत कमी एक लक्षण आढळून येत आहे. सर्वाधिक रुग्णांना थकवा जाणवत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून जगभरात यावर संशोधन सुरू आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdoctorडॉक्टर