शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोना रुग्णांचं कमी होतंय वजन, कुपोषणाचाही सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 6:26 PM

1 / 15
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 232,374,363 वर पोहोचली आहे. तर 4,759,028 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
2 / 15
कोरोनावरील उपचारानंतर आतापर्यंत 208,995,547 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येने तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे.
3 / 15
भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही तीन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,46,918 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,326 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 260 जणांचा मृत्यू झाला आहे.
4 / 15
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांची चिंता वाढली आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळत आहे.
5 / 15
कोरोनावर मात केल्यानंतर देखील तो रुग्णांचा पाठ सोडत नाही आहे. लोकांना विविध समस्या भेडसावत आहेत. काही लोकांची शुगर वाढत आहेत. तर काहींना थकवा जाणवतोय. तर काहींना श्वास घेताना अडचण येत असून वास घेण्याची क्षमता देखील कमी झाली आहे. अशा तक्रारी या कोरोनाग्रस्तांमध्ये पाहायला मिळत आहेत.
6 / 15
कोरोना रुग्णांचं आता वजन कमी होत असून कुपोषणाचाही सर्वाधिक धोका असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये कुपोषणाची समस्या पाहायला मिळत आहे.
7 / 15
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनने हा रिसर्च केला आहे. रिसर्चनुसार, जवळपास 30 टक्के कोरोना रुग्णांचं वजन हे पाच टक्क्यांपर्यंत कमी झालं होतं. तर अर्ध्याहून अधिक रुग्णांना कुपोषणाचा सर्वाधिक धोका आहे.
8 / 15
ज्या रुग्णांना याआधी गंभीर स्वरुपात म्युकोरमायसिस म्हणजे ब्लॅक फंगसची लागण झाली होती त्यांच्यामध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आढळून आलं आहे. अनेक कोरोना रुग्णांना थकवा जाणवतं आहे. तसेच अशक्तपणा देखील आला आहे.
9 / 15
काही कोरोनाग्रस्तांना भूक लागत नाही. त्यामुळेच त्याचं वजन कमी होत असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच शरीरावर येणाऱ्या सुजेमुळे कुपोषणाचा अधिक धोका असल्याचं रिसर्चमध्ये समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 15
कोरोना संसर्गामुळे आता डायबिटीजचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या शरीरातील शुगर लेव्हल वाढत आहे. देशातील डायबिटीज रुग्णांच्या संख्येत देखील आता अचानक वाढ झाली आहे.
11 / 15
दिल्लीमध्ये डायबिटीजच्या रुग्णांमध्ये 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. डॉक्टरांनी देखील कोरोनासोबत डायबिटीज रुग्णाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचं म्हटलं आहे. प्रामुख्याने कोरोना रुग्णांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे वाढत आहे.
12 / 15
काही दिवसांनी ते प्रमाण कमी देखील होतं. मात्र काही लोकांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे कमीच होत नाही. कोरोनातून ठीक झाल्यानंतर तीन महिन्यांनी देखील त्यांची शुगर लेव्हल वाढलेलीच पाहायला मिळाली आहे.
13 / 15
कोरोना पँक्रियाजवर अटॅक करतो. कोरोनाचा व्हायरस बीटा पेशींना तोडतो. यामुळे इन्सुलिनचे प्रमाण कमी होते आणि साखरेचे प्रमाण वाढते. याच दरम्यान याबाबत AIIMS ने एक नवीन प्रोटोकॉल जाहीर केला असून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
14 / 15
डायबिटीज रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालयात भरती झाल्यावर रुग्णांची डायबिटीज तपासणी देखील केली जाणार आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
15 / 15
कोरोनाच्या संकटात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पोषक आहार घेणं गरजेचं आहे. आपल्या जेवणात पौष्टीक घटकांचा समावेश करावा. तसेच रोज व्यायाम करण आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य