CoronaVirus Live Updates covid 19 how to know whether you are an asymptomatic covid carrier or not
CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! लक्षणं दिसत नसतानाही असू शकते कोरोनाची लागण; वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कसं? By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 11:30 AM1 / 10देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,805 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 / 10कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,024 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 3 / 10येत्या 10 ते 15 दिवसांत भारतातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाची लक्षणं प्रत्येकालाच सारखी जाणवतात, असं नाही. तसेच हा व्हायरस प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो.4 / 10काही लोकांना या व्हायरसमुळे गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो. तर काही लोकांमध्ये याची फक्त सौम्य लक्षणं दिसतात. कोणतंही लक्षण नसलेले लोक इतरांना सहज संक्रमित करू शकतात. 5 / 10कोरोनाची लक्षणं नसलेली एखादी व्यक्ती कोरोना कॅरियर आहे की नाही ते कसं शोधायचं हे जाणून घेऊया. काही लोकांमध्ये विविध कारणांमुळे कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. तरुणांची रोग प्रतिकारशक्ती ज्येष्ठांपेक्षा अधिक चांगली असल्यामुळे तरुणांमध्ये ज्येष्ठांपेक्षा सौम्य लक्षणं दिसतात. 6 / 10ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असं दिसून आलंय की विशेषत: 6 ते 13 वयोगटातील मुलांना कोरोनाची लक्षणं नसतात. कारण त्यांना श्वसनासंबंधी विषाणूजन्य आजार होण्याची अधिक शक्यता असते. 7 / 10जेव्हा या वयातील मुलांना कोरोना होतो तेव्हा ते कमी धोकादायक असते. याशिवाय, रोगाची गंभीरता ही एखाद्या व्यक्तीच्या लसीकरण स्थितीवर आणि तीव्र संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते.8 / 10तुम्ही Asymptomatic म्हणजेच लक्षणं नसलेले आहात की नाही हे तुम्ही कोरोनाची RT-PCR किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करून माहीत करून घेऊ शकता. कोरोनाची लागण होऊनही तुमच्या शरीरात कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी तुम्ही तुमची टेस्ट करून घ्यावी आणि स्वतःला क्वारंटाईन करावं. 9 / 10ताप, कफ, वास न येणे, चव न लागणे, सर्दी, थकवा जाणवणे, डोकेदुखी, श्वासोच्छवासाची समस्या, स्नायू किंवा शरीर दुखणे, घसा खवखवणे, उलट्या होणे, अतिसार, त्वचेवर पुरळ उठणे, डोळ्यात जळजळ आणि लालसरपणा, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणेही अनेक कोरोना रुग्णांना जाणवत आहेत. 10 / 10ज्या लोकांना नुकतंच Omicron BA.2 ची लागण झाली आहे, त्यांच्यामध्ये मळमळ, अतिसार, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ आणि पोट फुगणे यासारखी लक्षणं जाणवत आहेत. त्यामुळे सतरर्क राहणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications