शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : बोलताना तोंडातून निघणारे ड्रॉपलेट्स हवेत किती वेळ टिकून राहतात? वेळ वाचून व्हाल हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 4:18 PM

1 / 11
कोरोना व्हायरसचं थैमान थांबायचं नाव घेत नाहीये. दररोज हजारोंच्या संख्येने लोक व्हायरसचे शिकार होत आहेत. तेच रो हजारो लोकांचा जीवही जात आहे. यादरम्यान वैज्ञानिक याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करत आहेत. अशाच एका रिसर्चनुसार समोर आले आहे की, जर एखादी व्यक्ती जोराने बोलत असेल तर त्याच्या तोंडातून निघणारे हजारो ड्रॉपलेट्स 14 मिनिटांपर्यंत हवेत राहू शकतात.
2 / 11
सामान्यपणे बोलताना श्वासासोबत बाहेर निघणारे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स 8 मिनिटांपर्यंतच हवेत राहू शकतात. म्हणजे इतक्या वेळानंतरच रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स धूळ कणांसोबत कशाप्रकारे तरी पृष्ठभागावर पोहोचतील.
3 / 11
या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, 'हॉस्पिटल, नर्सिंग होम, कॉन्फरन्स रूम, सुपरस्टोर, क्रूज शिपसारख्या ठिकाणांवर असलेल्या लोकांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्याचं एक कारण हेही असू शकतं'.
4 / 11
अभ्यासकांनी या रिसर्चमध्ये कोरोना व्हायरस किंवा कोणताही दुसरा व्हायरस हवेत राहण्यावरून कोणताही अभ्यास केला नव्हता. रिसर्चमध्ये केवळ हे बघण्यात आलं की, लोक बोलत असताना कशाप्रकारे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स तयार होतात.
5 / 11
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अॅन्ड डायजेस्टिव अॅन्ड किडनी डिजीज आणि पेंसिलवेनिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांची प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायसेन्समध्ये प्रकाशित रिपोर्ट एका प्रयोगावर आधारित आहे.
6 / 11
या रिसर्चमध्ये मनुष्य बोलत असताना श्वासासोबत तोंडातून बाहेर येणाऱ्या हजारो ड्रॉपलेट्सवर रिसर्च करण्यासाठी एका लेजर लाइटचा वापर करण्यात आला होता. यात अभ्यासकांना आढळून आले की, जोरात बोलणारी व्यक्ती एका मिनिटात कमीत कमी 1 हजार ड्रॉपलेट्स तोंडातून बाहेर काढतो, ज्यात व्हायरस असू शकतात.
7 / 11
एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूच्या रिपोर्टनुसार, अभ्यासकांनी हा रिसर्च लॅबच्या वातावरणात केला. रिसर्चमध्ये वास्तविक वातावरणासारखं तापमान आणि आर्दतेत होणाऱ्या बदलांकडे लक्ष देण्यात आलं नव्हतं. रिपोर्टनुसार, अत्याधिक संवेदनशील लेजर लाइटच्या ऑब्जर्वेशनने हे समजलं आहे की, जोरात बोलताना तोंडातून हजारो ड्रॉपलेट्स बाहेर पडू शकतात.
8 / 11
याआधी करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आले होते की, दक्षिण कोरियाच्या एका कॉल सेंटरमध्ये कोरोना व्हायरसने फार जास्त लोक प्रभावित झाले होते. याच प्रकारचे हाल चीनच्या गर्दी असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये होते. अभ्यासकांचं असं मत आहे की, गर्दीच्या ठिकाणी किंवा कार्यक्रमांमुळे व्हायरस छोट्या एअरोसॉल द्वारेही पसरू शकतात. रिसर्चमध्ये आढळून आलं की, जोरात बोलल्यावर बाहेर येणारे ड्रॉपलेट्स बराच वेळ हवेत राहतात.
9 / 11
रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, छोटे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्समध्ये संक्रमण पसरवण्याचे पुरेसे कण असतात. पण अभ्यासक म्हणतात की, हे थेटपणे म्हणता येणार नाही की, ड्रॉपलेट्समुळे कोरोना व्हायरस पसरत आहे. पण फेसमास्क न वापरणाऱ्यांना संक्रमण होण्याचा धोका जास्त असल्याचे संकेत मिळत आहेत.
10 / 11
कोरोना व्हायरसच्या पसरण्यात खोकला आणि शिंकणे सर्वात मुख्य मानलं जातं आहे. आता हे म्हटलं जाऊ शकतं की, संक्रमित व्यक्ती बोलताना सुद्धा कोरोना व्हायरस पसरवू शकतो.
11 / 11
रिसर्चमध्ये हे बघण्यात आलं की, एक व्यक्ती बोलताना किती ड्रॉपलेट्स बाहेर येतात आणि ते किती वेळ हवेत राहतात. अभ्यासकांनुसार, एक संक्रमित व्यक्ती बोलताना एक मिनिटात 1 लाखांपेक्षा जास्त ड्रॉपलेट्स हवेत सोडू शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यResearchसंशोधन