CoronaVirus Marathi News hand sanitizers corona after expiry date SSS
CoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का? By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:33 PM1 / 15भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वा लाखांहून अधिक झाली असून आतापर्यंत 4000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.2 / 15देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. अनेकांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.3 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 4 / 15कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे. 5 / 15लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत. सॅनिटायझरचा तुडवडा निर्माण झाला असून त्याच किंमत वाढली आहे. अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. 6 / 15 प्रत्येक वस्तूची एक एक्सपायरी डेट असते, त्यानंतर त्या वस्तूचा वापर शक्यतो करू नये असा सल्ला दिला जातो. कोरोना व्हायरसच्या संकटात हँड सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. सॅनिटायझरच्या बाबतीतही हे लागू होतं का हे जाणून घेऊया. 7 / 15एक्सपायरी डेट संपल्यानंतरही हँड सॅनिटायझरचा वापर करता येतो का?, ते व्हायरसचा नाश करू शकतं का? याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 8 / 15हँड सॅनिटायझरमध्ये 60 ते 95 टक्के अल्कोहोल असल्यानं हँड सॅनिटायझर प्रभावी असतात. तेव्हाच ते जंतू आणि कोरोनासारख्या व्हायरसचा नाश करू शकतात.9 / 15सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे 60 टक्क्यांपेक्षा कमी झालं तर ते व्हायरस नियंत्रणात ठेवू शकतात म्हणजे त्यांची वाढ होणार नाही मात्र ते त्यांचा नाश करू शकत नाहीत.10 / 15हँड सॅनिटायझर वारंवार खोलल्याने त्यातील अल्कोहोल उडून जातं. आणि काही कालावधीनंतर त्यातील अल्कोहोलची मात्रा कमी होते. अल्कोहोल 60 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास ते प्रभावी ठरत नाही.11 / 15हँड सॅनिटायझरच्या बाटलीवर उत्पादक जी एक्सपायरी डेट ती अल्कोहोलचं प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा कमी होते तेव्हाची असते.12 / 15सॅनिटायझरची बाटली उघडल्यानंतर त्याचा हवेशी संपर्क आल्यानंतर त्यातील अल्कोहोलची मात्रा कमी होते. सॅनिटायझरची बाटली उघडली नसेल तर ती लवकर एक्सपायर होणार नाही. 13 / 15एक्सपायरी डेटनंतरही हँड सॅनिटायझर वापरू शकता. एक सौम्य डिसइन्फेक्टेन्ट म्हणून तुम्ही ते वापरू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 / 15सध्या कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.15 / 15हँड सॅनिटायझर लावून दिवे अथवा मेणबत्ती पेटवणे महागात पडू शकतं. त्यामुळे असं करू नका आणि काळजी घ्या. आणखी वाचा Subscribe to Notifications