CoronaVirus News : हँड सॅनिटायझरची खरेदी करताना 'या' गोष्टी चेक करता का?; FDAने दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 2:56 PM
1 / 17 देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या सात लाखांहून अधिक झाली असून आतापर्यंत 20,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 17 कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. 3 / 17 कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे. 4 / 17 लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत. सॅनिटायझरचा तुडवडा निर्माण झाला असून त्याची किंमत वाढली आहे. अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. 5 / 17 काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सॅनिटायझरबाबत लोकांना अलर्ट केलं होतं. बऱ्याच ठिकाणी विषारी सॅनिटायझर विकले जात असल्याची संतापजनक माहिती समोर आली होती. 6 / 17 बनावट, घातक हँड सॅनिटायझरपासून सावध राहण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे. सॅनिटायझरची निवड करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे जाणून घेऊया. 7 / 17 सॅनिटायझर घेताना कोणती काळजी घ्यावी यासंबंधी फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने महत्त्वाची माहिती दिली आहे. नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे. 8 / 17 कोरोनापासून बचाव करण्यासाठी चांगल्या आणि प्रभावी हँड सॅनिटायझरमध्ये 70 ते 80 टक्के अल्कोहल असणं गरजेचं आहे. त्वचेला इजा होईल असं कोणतंही केमिकल नसावं. 9 / 17 हँड सॅनिटायझरमध्ये 60 ते 95 टक्के अल्कोहोल असल्यानं हँड सॅनिटायझर प्रभावी असतात. तेव्हाच ते जंतू आणि कोरोनासारख्या व्हायरसचा नाश करू शकतात. 10 / 17 सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे 60 टक्क्यांपेक्षा कमी झालं तर ते व्हायरस नियंत्रणात ठेवू शकतात म्हणजे त्यांची वाढ होणार नाही मात्र ते त्यांचा नाश करू शकत नाहीत. 11 / 17 व्हायरसचा खात्मा करण्यासोबतच हाताची त्वचा उत्तम ठेवण्याचं काम सॅनिटायझरने करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याची खरेदी करताना त्यात कोणते घटक आहे हे एकदा नक्की तपासा. 12 / 17 बाजारात सध्या मिथेनॉल असलेले काही हँड सॅनिटायझर उपलब्ध आहेत. मात्र अशा सॅनिटायझरचा वापर करणं प्रकर्षाने टाळा. त्याऐवजी दुसऱ्या सॅनिटायझरची निवड करा. 13 / 17 मिथेनॉलपासून हे बनावट सॅनिटायझर तयार केले जात असून, मिथेनॉल हा एक अतिशय विषारी पदार्थ आहे. त्यामुळे हात स्वच्छ करण्यासाठी अशा सॅनिटायझरचा वापर करू नका. 14 / 17 काही ठिकाणी मिथेनॉल असलेले सॅनिटाझर विकले जात आहेत. त्यामुळे लोकांनी वेळीच सावध होण गरजेचं आहे अशी माहितीही एफडीएने दिली आहे. 15 / 17 सॅनिटायझरची खरेदी करण्याआधी त्याची नीट माहिती घ्या. एकदा ते तपासून पाहा. त्यातील घटक कोणते आहेत आणि ते अपायकारक आहेत का हे जाणून घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 16 / 17 हँड सॅनिटायझर वारंवार खोलल्याने त्यातील अल्कोहोल उडून जातं. आणि काही कालावधीनंतर त्यातील अल्कोहोलची मात्रा कमी होते. अल्कोहोल 60 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास ते प्रभावी ठरत नाही. 17 / 17 सॅनिटायझरची बाटली उघडल्यानंतर त्याचा हवेशी संपर्क आल्यानंतर त्यातील अल्कोहोलची मात्रा कमी होते. सॅनिटायझरची बाटली उघडली नसेल तर ती लवकर एक्सपायर होणार नाही. आणखी वाचा