CoronaVirus Marathi News louis j ignarro says breathing correctly kill covid19
CoronaVirus News : श्वासोच्छवासाच्या योग्य पद्धतीने कोरोनावर करता येते मात; नोबेल विजेत्या तज्ज्ञाचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 4:33 PM1 / 15जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत आता चौथ्या स्थानी आला आहे. 2 / 15जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 93 लाखांवर गेली आहे. तर 479879 जणांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. 3 / 15कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे.4 / 15भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 4,56,183 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 14,476 लोकांचा मृत्यू झाला आहे. 5 / 15कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. 6 / 15कोरोना व्हायरसवर अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. याच दरम्यान श्वासोच्छवासाच्या मदतीने कोरोनाला हरवू शकतो अशी दिलासादायक माहिती आता समोर येत आहे. 7 / 15कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी श्वासोच्छवास अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामदतीने कोरोना नष्ट होण्यास मदत होऊ शकते असा दावा नोबेले विजेते फार्मोकोलॉजिस्ट लुईस जे इग्नारो यांनी केला आहे. 8 / 15नाकावाटे श्वास घेऊन नंतर तो तोंडावाटे सोडला तर आपल्या शरीरावर हल्ला केलेल्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं असं लुईस जे इग्नारो यांनी म्हटलं आहे. 9 / 15द कनव्हर्सेशनमध्ये इग्नारो यांचा हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे. 1998 रोजी त्यांना फिजिओलॉजीसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे. इग्नारो यांनी श्वासोच्छवास आणि कोरोनाचा संबंध सांगितला आहे. 10 / 15संशोधनानुसार, अशा पद्धतीने श्वास घेतल्याने नाकामध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. जे फुफ्फुसामध्ये रक्तप्रवाह वाढवतं आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळीही वाढवते.11 / 15जेव्हा नाकावाटे श्वास घेतला जातो तेव्हा नायट्रिक ऑक्साईड थेट फुफ्फुसामध्ये पोहोचतो. ज्यामुळे फुफ्फुसामध्ये कोरोना व्हायरसचे रिप्लिकेशन होत नाहीत आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. यामुळे त्या व्यक्तीला खूप फ्रेश वाटतं.12 / 15शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड सतत तयार होतं. ते धमन्यांमध्ये खासकरून फुफ्फुसांमध्ये एन्डोथेलियम (Endothelium) तयार करण्यास मदत करतं. हाय ब्लड प्रेशरची समस्याही यामुळे कमी होते.13 / 15योग्य पद्धतीने श्वास घेतल्यास शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. एका हिंद वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 / 15कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. 15 / 15कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications