CoronaVirus Marathi News people over 6ft tall more than double the risk
CoronaVirus News : बापरे! उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 2:06 PM1 / 13देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून दिवसागणिक धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल 15 लाखांचा टप्पा पार केला आहे. 2 / 13देशात गेल्या 24 तासांत 768 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 34,193 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 / 13कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी समोर येत आहेत. एका रिसर्चमधून एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.4 / 13काही व्यक्तींसाठी कोरोना जीवघेणा ठरत आहेत. त्यांना मृत्यूचा धोका अधिक असल्याची माहिती मिळत आहे. उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आली आहे.5 / 136 फूट आणि त्यापेक्षा जास्त उंच असलेल्या लोकांचा कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका हा इतर व्यक्तींच्या तुलनेत दुप्पट आहे असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 6 / 13ब्रिटनच्या मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी आणि ओपन युनिव्हर्सिटीसह आंतरराष्ट्रीय रिसर्चर्सच्या एका टीमने याबाबत संशोधन केलं आहे. जवळपास दोन हजार लोकांचा यासाठी अभ्यास करण्यात आला होता. 7 / 13रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकांचं पर्सनल प्रोफाईल, काम आणि घर या गोष्टींचा कोरोनाशी कसा संबंध आहे. याचा अभ्यास देखील या रिसर्चमध्ये प्रामुख्याने करण्यात आला. 8 / 13कोरोना व्हायरसचा लोकांवर होणारा परिणाम नेमका किती आणि कसा आहे याचा अभ्यास करताना 6 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती मिळत आहे.9 / 13फक्त जमिनीवरील ड्रॉपलेट्स नाहीत तर हवेतील ड्रॉपलेट्सही कोरोनाचा प्रसार करतात. मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर इवान कॉन्टोपॅन्टेलिस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 10 / 13कोरोना व्हायरसचा प्रसार हा हवेतून होत असून ड्रॉपलेट्समुळे अधिक लोक संक्रमित होत असल्याचं देखील संशोधकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.11 / 13जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. 12 / 13अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची आकडा एक कोटीच्या वर गेला आहे. 13 / 13जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश देखील आले आहे आणखी वाचा Subscribe to Notifications