CoronaVirus Marathi News sero survey corona anti body in delhi
CoronaVirus News : आनंदाची बातमी! प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 3:09 PM1 / 14देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 53,08,015 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना जीव गमवावा लागला आहे.2 / 14देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,337 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,247 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत. 3 / 14कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. याच दरम्यान कोरोनासंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 4 / 14प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडी विकसित झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या सीरो सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. 5 / 14जवळपास 33 टक्के दिल्लीकरांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत. सीरो सर्व्हेनुसार, दोन कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीत 66 लाख जणांना कोरोनाची लागण झाली होती. 6 / 1417 हजार नमुने घेण्यात आले होते. या सर्वेतील महत्त्वाचे मुद्दे पुढच्या आठवड्यात जाहीर केलं जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे अँटीबॉडी विकसित झाल्यामुळे बरे झालेल्या लोकांचा आकडा हा वाढू शकतो. 7 / 14मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयात नमुन्यांचं विश्लेषण करण्यात येत आहे. याच महाविद्यालयाकडून याआधी करण्यात आलेले दोन सीरो सर्व्हे देखील तेथेच करण्यात आले होते. 8 / 14पहिल्या सीरो सर्व्हेमध्ये 23 टक्के तर दुसऱ्या सीरो सर्व्हेमध्ये 29 टक्के लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडी आढळून आली होती. दिल्ली सरकारने दर महिन्याच्या सुरुवातीला सीरो सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे 9 / 14दिल्लीत कोरोना व्हायरसची स्थिती नेमकी कशी आहे हे समजणं हा या मागचा उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. 10 / 14वयोगटानुसार नमुने जमा करण्यात आले होते. 18-49 या वयोगटात सर्वाधिक नमुने जमा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 14जगभरातील अनेक वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी या कंपन्या चाचणीत पूर्ण पारदर्शकता ठेवत नसल्याच म्हटलं आहे. विशेषतः जेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव लशीची चाचणी थांबते तेव्हा कंपनी याबाबत माहिती देण्यास नकार देतात.12 / 14अॅस्ट्रॉजेनेका (AstraZeneca) ही लस याचं उदाहरण आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या लशीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.13 / 14कंपनीने रुग्णांच्या स्थितीबद्दल किंवा लसीची चाचणी थांबवण्यामागचे कारण सांगितले नाही. तसेच पॅनेलचा रिपोर्टही समोर आला नाही. कंपनी लसीबाबत फारच कमी माहिती देत आहेत.14 / 14तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांनी केलेले विधान हे संशोधनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्याचे आश्वासन देत नाही. अमेरिकेतील तीन कंपन्या- अॅस्ट्रॉजेनेका, मॉडर्ना आणि फायझर अखेरच्या टप्प्यात आहेत. या तिघांनी चाचण्यांचे प्रोटोकॉल आणि विश्लेषण प्लॅन पुढे आणला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications