शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: चौथ्या लाटेआधी कोरोनानं वाढवलं टेन्शन; त्वचेवर दिसू लागलं अजब लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 5:34 PM

1 / 8
देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज २ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.
2 / 8
युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लागू झाले आहेत. भारतात ओमायक्रॉन BA.2 व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
3 / 8
ओमायक्रॉन BA.2 व्हेरिएंटच्या प्रादुर्भावाचा वेग जास्त आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्येही बदल झाला आहे. ताप, खोकला हीच कोरोनाची लक्षणं नाहीत. त्यात आता आणखी भर पडली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
4 / 8
कोरोना विषाणूचा प्रभाव केवळ श्वसन यंत्रणेपर्यंत मर्यादित नाही. त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. विविध अवयवांवर कोरोना विषाणूचे परिणाम दिसतात. त्यात त्वचेचादेखील समावेश आहे.
5 / 8
ताप, घशात खवखव, थकवा, नाक गळणं ही कोरोनाची लक्षणं आहेत. कोरोना त्वचेला प्रभावित करू शकतो असं त्वचातज्ज्ञांनी सांगितलं. कोरोना विषाणू ह्यूमन एंडोथेलियल सेल्सला संक्रमित करू शकतो. त्यामुळे त्वचेला सूज येऊ शकते, त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
6 / 8
ब्रिटनच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यानंतर पायाची बोटं आणि अंगठ्याला सूज येते. सूज आलेला भाग जांभळा होतो. काहीवेळा त्वचेचा रंग कमी अधिक प्रमाणात गडद किंवा काळा होतो. लागण झाल्यानंतरच्या काही दिवसांनंतर त्वचेच्या रंगात हा बदल दिसतो. तो १२ पेक्षा अधिक आठवडे दिसून येतो.
7 / 8
कोरोनाची लागण झालेल्या काहींच्या पायांच्या बोटांचा रंग बदलतो. सूज येते. याला वैद्यकीय भाषेत कोविड टोज म्हणतात. अनेक रुग्णांच्या शरीरावर फोड येत आहेत. अवघ्या काही तासांत हे फोड येतात आणि आपोआप नाहिसे होतात.
8 / 8
कोरोना झालेल्या काहींना पिट्रियासिस रोसिया नावाच्या त्वचारोगाचा सामनादेखील करावा लागत आहे. पिट्रियासिस रोसिया झाल्यावर त्वचेवर लाल चकते येतात. त्यांचा रंग गडद होत जातो. कधीकधी तो काळादेखील पडतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या