शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिलासादायक! कोणत्याही साईड इफेक्टशिवाय चीनच्या 'या' लसीने कोरोनाला हरवता येणार; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 9:56 AM

1 / 11
कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटना लक्षात घेता चीनच्या एका लसीने आशेचा किरण दाखवला आहे. चीनच्या सिनोवेक बायोटेक Sinovac Biotech कंपनीने दावा केला आहे की त्यांच्या लसीचे चाचणी दरम्यान सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या लसीचे नाव कोरोनावॅक असं ठेवलं आहे. ही लस पहिल्या टप्प्यातील चाचणीत रोगप्रतिकारकशक्तीवर सकारात्मक प्रभाव पाडत आहे. असं दिसून आलं.
2 / 11
बीजिंगच्या या कंपनीने दावा केला आहे की, या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. १४ दिवसांच्या अंतराने दिलेल्या या लसीमुळे दोन आठवड्यानंतर ९० टक्के लोकांमध्ये न्यूट्रलाइजिंग एंटीबॉडी विकसित झाल्या आहेत. चीनमध्ये लसीची चाचणी १८ ते ५९ या वयोगटातील ७४३ लोकांवर करण्यात आली होती.
3 / 11
आता या लसीचे परिक्षण २८ दिवसांनी केले जाणार आहे. यातून मिळत असलेल्या माहितीची तज्ज्ञांना प्रतिक्षा आहे. सिनोवेक ही कंपनी या लसीचे सकारात्मक अहवाल ऐकडेमिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्याच्या तयारीत आहे. या कंपनीचे चेअरमन सीईओ वेइदोंग यिन यांनी सांगितले की, लोकांना कोरोना विषाणूंपासून वाचवण्यासाठी ही कंपनी उत्पादन क्षमता वाढवून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या तयारीत आहे. जास्तीत जास्त डोस तयार करण्याचा कंपनीचा प्रयत्न असणारआहे.
4 / 11
पुढे त्यांनी सांगितलेकी, लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ही लस सुरक्षित असून शरीरातील रोगप्रतिकराकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यानंतरच्या टप्प्यात यश मिळाल्या लस यशस्वीरित्या सगळ्यांसाठी तयार होऊ शकते.
5 / 11
ब्राझिमध्ये बुट्टान कंपनीच्या सहयोगाने या लसीचे परिक्षण केले जाणार आहे. ब्राझिलचे अधिकारी तसचं ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका पीएलसी यांच्या सहयोगाने लस तयार करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
6 / 11
अमेरिकेतील कंपनी बायोटेक मॉडर्नने लसीचे शेवटचे परिक्षण जुलैमध्ये करणार असल्याची माहिती दिली आहे. जुलैमध्ये तीस हजार लोकांवर या लसीची चाचणी करण्यात येणार आहे.
7 / 11
Moderna Inc कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शेवटच्या टप्प्यात या लसीसाठी १०० मायक्रोग्राम डोस तयार केले आहेत.
8 / 11
याशिवाय ५० कोटी डोस लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या तयारीत ही कंपनी आहे. स्विस ड्रगमेकर Lonza यांच्यासह मिळून हे डोस तयार केले जाणार आहेत.
9 / 11
याशिवाय ५० कोटी डोस लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या तयारीत ही कंपनी आहे. स्विस ड्रगमेकर Lonza यांच्यासह मिळून हे डोस तयार केले जाणार आहेत.
10 / 11
याशिवाय ५० कोटी डोस लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या तयारीत ही कंपनी आहे. स्विस ड्रगमेकर Lonza यांच्यासह मिळून हे डोस तयार केले जाणार आहेत.
11 / 11
याशिवाय ५० कोटी डोस लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या तयारीत ही कंपनी आहे. स्विस ड्रगमेकर Lonza यांच्यासह मिळून हे डोस तयार केले जाणार आहेत.
टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या