CoronaVirus News corona re infection how many times can one get re infected with covid 19
CoronaVirus News : बापरे! 7 दिवसांनी पुन्हा तेच लक्षण...कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी होऊ शकतं रिइन्फेक्शन? By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 4:32 PM1 / 15देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. 2 / 15गेल्या 24 तासांत कोरोनाचे 67,597 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,188 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच रिसर्चमधून नवनवीन माहिती समोर येत आहे. 3 / 15सध्या डॉक्टरांकडे अनेक केसेस येत आहेत, ज्यामध्ये 7 ते 10 दिवसांपूर्वी कोरोनामधून बरे झालेल्या व्यक्तीमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. अनेक डॉक्टर याला पुन्हा संसर्ग झाल्याचं म्हणत आहेत तर काही डेड व्हायरस उपस्थिती असल्याचे सांगत आहेत. 4 / 15इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना काही दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोना लक्षणे दिसून येत आहेत. ते रिइन्फेक्शन होऊ शकत नाही.5 / 15ICMR चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. समीरन पांडा यांनी काही दिवसांपूर्वी रिइन्फेक्शनबाबत एक अभ्यास करण्यात आला होता. त्यामध्ये असे आढळून आले की एखाद्या व्यक्तीला बरे झाल्यानंतर केवळ 102 दिवसांनी पुन्हा संसर्ग होऊ शकतो असं म्हटलं आहे.6 / 15जर ती व्यक्ती नुकतीच कोरोनातून बरी झाली असेल आणि 10-20 दिवसांनी किंवा एक महिन्यानंतर त्याला पुन्हा लक्षणे दिसू लागली, तर त्याला रिइन्फेक्शन मानलं जात नाही. काही दिवसांपूर्वीच व्हायरसची लागण झाल्यामुळे असं होत असल्याचं म्हटलं आहे. 7 / 15कधीकधी जुना व्हायरस शरीरात राहतो आणि काही दिवसांनी पुन्हा रिएक्ट करतो, परंतु जेव्हा तो पुन्हा रिएक्ट करतो तेव्हा फक्त किरकोळ लक्षणं दिसतात, गंभीर नसतात. सध्या काही प्रकरणे समोर येत आहेत, ज्यामध्ये बरे झाल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी पुन्हा लक्षणं दिसू लागली आहेत.8 / 15आमचा अभ्यास सांगतो की बरे झाल्यानंतर 102 दिवसांपर्यंत पुन्हा संसर्ग होऊ शकत नाही. 102 दिवसांनंतर लक्षणे आढळल्यास, त्याला पुन्हा संक्रमण म्हटले जाऊ शकते. तुम्हाला एकदा संसर्ग झाला की त्यात अँटीबॉडीज इतके तयार होतात की लवकरच पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नसते9 / 15संसर्ग झाल्यानंतर किमान तीन महिने अँटीबॉडीजची पातळी खूप जास्त राहते, त्यामुळे रिइन्फेक्शन इतक्या लवकर होत नाही. ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून बनवलेले अँटीबॉडी किती काळ टिकतात हा अजूनही संशोधनाचा विषय आहे.10 / 15बहुतेक लोक 7 ते 10 दिवसांत बरे होत आहेत. पण जे लोक मधुमेह, बीपी, कॅन्सर, किडनी, एचआयव्ही सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांना बरे होण्यास बराच वेळ लागतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 15कोरोनाबाबत रोज नवनवीन संशोधन समोर येत आहे. अशाच एका रिसर्चने आता चिंता वाढवली आहे. एका नवीन रिसर्चमधून असे समोर आले आहे की, कोरोना व्हायरसची लक्षणे आता 10 किंवा 14 दिवसांत नव्हे तर दोन दिवसांत दिसून येत आहेत.12 / 15इम्पीरियल कॉलेज लंडनने कोरोना व्हायरसची लक्षणे संदर्भात DHSC आणि रॉयल फ्री लंडन NHS फाउंडेशन ट्रस्टच्या सहकार्याने हा अभ्यास केला आहे. अभ्यासादरम्यान संशोधकांच्या एका गटाने काही निरोगी लोकांना व्हायरसने संक्रमित केले.13 / 15ही चाचणी 36 निरोगी तसेच लसीकरण न झालेल्या सहभागींवर घेण्यात आली ज्यांना यापूर्वी कधीही व्हायरसचा संसर्ग झाला नव्हता. सहभागींचे वय 18 वर्षे ते 30 वर्षे होते. 36 सहभागींपैकी केवळ 18 सहभागींना कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि 16 जणांना सौम्य किंवा गंभीर लक्षणे आढळली.14 / 15संशोधकांचे म्हणणे आहे की ज्या रुग्णांना विषाणूची लागण झाली होती त्यांना सौम्य किंवा गंभीर लक्षणे दिसून आली. ही लक्षणे हलकी ते मध्यम विकसित झाली आहेत, ज्यात नाक वाहणं, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यांचा समावेश आहे.15 / 15सहभागींपैकी कोणालाही गंभीर संसर्ग झाला नाही. 13 लोकांनी त्यांची वास घेण्याची क्षमता कमी झाल्याची नोंद केली, जी 90 दिवसांत परत आली. संशोधकांनी सांगितले की बहुतेक रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसची फक्त सौम्य किंवा मध्यम लक्षणे दिसून आली. आणखी वाचा Subscribe to Notifications