CoronaVirus News : Corona virus dangerous covid signs and symptoms that requires hospitalization
CoronaVirus News : समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 1:39 PM1 / 11कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात कहर केला आहे. देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण वेगानं पसरताना दिसून येत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कोरोना स्ट्रेनआधीपेक्षा जास्त धोकादायक आहे. नव्या स्ट्रेनच्या कोरोनाची लक्षणंही फार वेगळी आहेत. यादरम्यान काही रुग्ण होम क्वारंनटाईन असताना रिकव्हर होत आहेत. तर काहीजणांना गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती होण्याची वेळ येत आहे. कोरोनाच्या गंभीर लक्षणांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 2 / 11श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत दुखणं ही गंभीर संक्रमणाची लक्षणं आहेत. कोरोना व्हायरस एक रेस्पिरेटीक इंफेक्शन आहे. या व्हायरसमुळे अपर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये निरोगी सेल्सवर हल्ला चढवला जातो. परिणामी रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. तसंच मृत्यूचा धोकाही वाढतो. 3 / 11कोरोना संक्रमित झाल्यानंतर शरीरातील ऑक्सिजन लेव्हलवर याचा वाईट परिणाम झालेला दिसून येतो. साधारणपणे कोरोना पॉजिटिव्ह झाल्यानंतर माणसाच्या फुफ्फुसांमध्ये एअर बॅगमध्ये फ्लूड भरलेले असते. शरीरात ऑक्सिजन लेव्हलची कमतरता भासते. त्यानंतर रुग्णाला त्वरित रुग्णालयातल दाखल करायला हवं. 4 / 11कोविड १९ आणि ब्रेन फंक्शन तसंच नर्वस सिस्टिला प्रभावित करते. त्यामुळे चक्कर येणं, बेशुद्ध होणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो. एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णांना बोलण्यास त्रास होत असेल, जीभ जड वाटत असेल तर त्वरित रुग्णालयात जायला हवं. 5 / 11छातीत कोणत्याही प्रकारच्या वेदना होत असतील तर दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. सार्स कोव्ह २ फुफ्फुसांच्या म्यूकोसल लाइनिंगवर अटॅक करतो. त्यामुळे छातीतील वेगवेगळ्या भागात जळजळ जाणवते. अशा स्थितीत जास्तवेळ वाट न पाहता तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 6 / 11कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर अनेकांचे ओठ निळे पडतात आणि तोंड पिवळे पडते. शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी असल्यास अशा समस्या उद्भवतात. वैद्यकिय परिभाषेत याला हायपोक्सिया असं म्हणतात. हायपोक्सियामध्ये शरीराला पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे शरीराचे कार्य व्यवस्थित होत नाही. 7 / 11कोरोनाच्या लक्षणांबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. आधी पूर्वी ताप, सर्दी, खोकला ही कोरोनाची लक्षणं होती. आता कोरोनाच्या म्यूटेशननंतर जीभेत बदल होणं, ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम, अतिसार ही कोरोनाची लक्षणं दिसून आली आहेत. अशी लक्षणं असतील तर त्वरित चाचणी करून घ्या. आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या. लक्षणं तीव्रतेनं जाणवण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.8 / 11तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर कुठल्याही व्यक्तीला कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक अवधी लोटला असेल. तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसतील. तर रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर चाचणी करण्याची गरज नसेल.9 / 11कोरोनाची चाचणी करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी हा उत्तम पर्याय आहे. रॅपिट अँटिजन टेस्ट कोरोनाचा रिपोर्ट त्वरित देते. मात्र जर रॅपिड अँटिजन टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह दिसत असेल आणि तरीही रुग्णामध्ये लक्षणे दिसत असतील तर आरटी-पीसीआर चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.10 / 11आरोग्य विषयक तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही कुठल्याही बाधिक व्यक्तीपासून ६ फुटांपेक्षा कमी अंतरावर सुमारे १५ मिनिटे संपर्कात राहिल्यास तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे बाधित व्यक्तीपासून दूर राहा. बाहेर जाण्यापूर्वी मास्क वापरा. तसेच आल्यावर हात चांगल्या प्रकारे सॅनिटाइझ करून घ्या.11 / 11जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर होम क्वारेंटाइन किंवा आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती व्हा. घरामध्ये मुले आणि आजारी व्यक्तींच्या संपर्कात येऊ नका. आणखी वाचा Subscribe to Notifications