Coronavirus News : Coronavirus long covid bigger health problem excess deaths
चिंताजनक! कोरोना संक्रमणानंतर उद्भवू शकते 'लॉन्ग कोविड' ची समस्या; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 4:26 PM1 / 9कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जगभरातील लोकांमध्ये कोरोनाबाबात अजूनही चिंतेचं वातावरण आहे. आतापर्यंत १० लाख ४६ हजार लोकांचा मृत्यू कोरोना संक्रमणामुळे झाला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनानंतर लॉन्ग कोविड समस्या ('Long Covid') निर्माण होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया लॉन्ग कोविड म्हणजे नक्की काय? 2 / 9कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा त्या स्थितीला लॉन्ग कोविड म्हणतात. कोरोना संक्रमण पूर्णपणे कमी झाल्यानंतर या समस्या दीर्घकाळ शरीराला उद्भवू शकतात. कारण कोरोनातून जीव वाचलेल्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे आजारपणही मोठ्या प्रमाणावर लोकांना उद्भवते. त्यामुळे अनेक लोकांना रोजची कामं करण्यासाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 3 / 9कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत किती लोकांना कोरोना झाला आणि किती लोक सामना करत आहेत हे सांगणं कठीण आहे. म्हणून लॉन्ग कोविडचे शिकार झालेल्या लोकांची संख्याही वाढू शकते. मोठ्या संख्येने लोकांना आरोग्यसेवा पुरवणं कोणत्याही देशातील सरकारसाठी कठीण होऊ शकतं.4 / 9ब्रिटनच्या प्रसिद्ध तज्ज्ञांचा गट स्पेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम झाला आहे. श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा येणं तसंच शरीरातील इतर भागांवरही परिणाम होत आहे. अनेक महिन्यांपर्यंत असंच सुरू राहण्याची शक्यता आहे. 5 / 9किंग्स कॉलेज लंडनच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमित असलेल्या १० पैकी एका व्यक्तीला लॉन्ग कोविडची समस्या उद्भवू शकते. तज्ज्ञांनी जवळपास ४० लाख लोकांच्या माहितीचे विश्लेषण यासाठी केले होते. दर ५० पैकी एका व्यक्तीला ३ महिन्यानंतरसुद्धा 'Long Covid' चा सामना करावा लागत होता. 6 / 9अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार महिलांना लॉन्ग कोविडच्या समस्येचा सामना सगळ्यात जास्त करावा लागतो. ४५ वर्षाच्या लोकांना लॉन्ग कोविडचा धोका जास्त असतो. 7 / 9ब्रिटेनच्या टोनी ब्लेअर इंस्टीट्यूट फॉर ग्लोबल चेंजने दिलेल्या माहितीनुसार 'Long Covid' बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी सरकारने पाऊलं उचलायला हवीत. 8 / 9दरम्यान जगातील प्रत्येक 10 व्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. असं जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.9 / 9डब्ल्यूएचओच्या या दाव्यावर विश्वास ठेवल्यास, सध्या जगातील कोरोना रुग्णांची संख्या पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण रुग्णांपेक्षा 20 पट जास्त असू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications