CoronaVirus News : Coronavirus is now showing new symptoms in china myb
CoronaVirus :चीनमध्ये दुसऱ्यांदा कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार; लक्षणांमध्ये होत आहेत 'हे' बदल By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 9:59 AM1 / 9 कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. चीनमधून संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसबाबत नवीन माहिती समोर येत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगाने व्हायला सुरूवात झाली आहे. एव्हढंच नाही तर कोरोनाबाधितांच्या लक्षणांमध्येही अनेक बदल झालेले दिसून येत आहेत. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी इतर लोकांपासून वेगळं आणि विशेष निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. 2 / 9माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या जिलिन आणि हेईलांगजिआंगमधील रुग्णांमध्ये कोरोनाची नवीन लक्षणं दिसून आली आहेत. पहिल्या दिवशी दिसत असलेल्या लक्षणांच्या तुलनेत ही लक्षणं वेगळी आहेत. ही लक्षणं समजण्यासाठी कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, हा व्हायरस जास्त वेळ रुग्णाच्या शरीरात राहिल्यामुळे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतो.3 / 9चीनच्या नॉर्थ ईस्ट भागातील रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसून आली. या रुग्णांमधील संक्रमण पूर्णपणे बरं होण्याासाठी १४ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला होता. 4 / 9चीनच्या नॉर्थ ईस्ट भागातील रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसून आली. या रुग्णांमधील संक्रमण पूर्णपणे बरं होण्याासाठी १४ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला होता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लक्षणांबाबत जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत संक्रमित रुग्ण अनेकांपर्यंत संक्रमण पोहोचवू शकतो. मागील दोन आढवड्यात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या ४६ केसस, शुलन, जिलिंह आणि शेग्यांगमध्ये समोर आल्या आहेत.5 / 9लॉस एलमोस नॅशनल लेब्रोटरीने सुद्धा याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांमध्ये दिसत असलेल्या नवीन लक्षणं जास्तवेळपर्यंत टिकून राहू शकतात. त्याचे खूप गंभीर परिणा होऊ शकतात. 6 / 9नॅशनल हेल्थ कमीशन ग्रुपचे सदस्य क्यू हेइबो यांनी कोरोना व्हायरसच्या बदलत्या लक्षणांमध्ये रुग्णांच्या फुफ्फुसाचे गंभीर स्वरुपात नुकसान होत असल्याचे सांगितले. 7 / 9सध्या डॉक्टरांची एक टिम रुग्णांच्या लक्षणांमध्ये होत असलेल्या बदलांचे निरिक्षण करत आहेत. जेणेकरून व्हायरसचं बदलेलं स्वरुप समजण्यास मदत होईल. 8 / 9सध्या डॉक्टरांची एक टिम रुग्णांच्या लक्षणांमध्ये होत असलेल्या बदलांचे निरिक्षण करत आहेत. जेणेकरून व्हायरसचं बदलेलं स्वरुप समजण्यास मदत होईल. 9 / 9सध्या डॉक्टरांची एक टिम रुग्णांच्या लक्षणांमध्ये होत असलेल्या बदलांचे निरिक्षण करत आहेत. जेणेकरून व्हायरसचं बदलेलं स्वरुप समजण्यास मदत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications