CoronaVirus News : Coronavirus vaccine could be ready in october says pharma company myb
दिलासादायक! अखेर 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस येणार, हजारो लोकांवर चाचणी होणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:02 PM1 / 7कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील लोकांच्या मनात दहशतीचे वातावरण तयार झालं आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आत्तापर्यंत कोणतीही लस किंवा औषध विकसीत झालं नसून सर्वच देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरु आहेत. तर काही प्रयोग यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाचणी करण्यासाठी काही संशोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना व्हायरसची लस शोधण्याबाबत अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपनीने दावा केला आहे. 2 / 7जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपनी फायजरने एक पाऊल पुढे टाकलं आहे. फायजर कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या वॅक्सिनचे क्लिनिकल ट्रायल सप्टेंबरमध्ये हजार लोकांवर करण्यात येणार आहे. 3 / 7फायजर कंपनीचे सीईओ आणि चेअरमन अलबर्ट बॉर्ला यांनी दावा केला आहे की, विचार केल्याप्रमाणे या लसीबाबत सकारात्मक परिणाम झाल्यास ऑक्टोबरमध्ये या वॅक्सिनचे लाखो नमुने तयार करण्यात येणार आहेत. 4 / 7कंपनीने जी लस तयार केली आहे.त्या लसीला BNT162 असं नाव देण्यात आलं आहे. ५ मार्चला जर्मनीमध्ये या लसीच्या पहिल्या डोसची माणसांवर चाचणी करण्यात आली होती. 5 / 7फायजर कंपनी सध्या चार वेगवेगळ्या लसी विकसित करण्यासाठी काम करत आहे. कंपनीतील संशोधकांच्यामते जून किंवा जुलैमध्ये कोणती लस सगळ्यात जास्त परिणामकारक आणि प्रभावी आहे हे सिद्ध होईल. यासाठी माहिती गोळा करून विश्लेषण करण्याचे काम संशोधक करत आहेत.6 / 7जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये वॅक्सिन तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. WHO ने दिलेल्या माहितीनुसार जगभरात १२० लसींवर ट्रायल सुरु आहे. अमेरिकन आरोग्य अधिकाऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे. की, वॅक्सिन तयार करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो.7 / 7जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये वॅक्सिन तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. WHO ने दिलेल्या माहितीनुसार जगभरात १२० लसींवर ट्रायल सुरु आहे. अमेरिकन आरोग्य अधिकाऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे. की, वॅक्सिन तयार करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications