CoronaVirus News covid 19 new symptom surfaced who issued warning
Covid 19 New Symptom: संकटं संपता संपेना! कोरोना आता पाठ सोडेना; 'या' नव्या लक्षणाने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 9:03 AM1 / 15वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला असून कोट्यवधी लोकांना लागण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. 2 / 15कोरोना महामारी अजून संपलेली नाही. सर्व आरोग्य संस्था अजूनही त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन संशोधन करत आहेत. कोरोनाची अनेक (Several symptoms) लक्षणे सूचीबद्ध करण्यात आली आहेत. पण एक लक्षण आहे ज्याची फारशी चर्चा झालेली नाही. 3 / 15आता जागतिक आरोग्य संघटनेने हे लक्षण गंभीर असल्याचं सांगत इशारा जारी केला आहे. 'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, NHS च्या ताज्या अपडेट केलेल्या यादीतून कोरोना व्हायरसचं एक लक्षण गायब आहे, मात्र WHO ने याबाबत अलर्ट केलं आहे. 4 / 15थंडी वाजणे, सततचा खोकला, वास किंवा चव न समजणं ही कोरोनाची मुख्य लक्षणे आहेत. यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं, आजारी वाटणे, थकवा, वेदना, घसा खवखवणे, डोकेदुखी, नाक वाहणे, भूक न लागणे आणि अतिसार ही लक्षणं त्यात सूचीबद्ध केली आहेत.5 / 15अधिकृतपणे सूचीबद्ध नसलेले लक्षण म्हणजे 'भ्रम'. रोग नियंत्रण केंद्र (CDC) आणि WHO या दोन्ही संस्थांनी भ्रम हे कोरोना व्हायरसचे लक्षण म्हणून सूचीबद्ध केले आहे. WHO च्या यादीनुसार, भ्रम हे 'गंभीर लक्षण' म्हणून सूचीबद्ध केलं गेलं आहे.6 / 15कोणालाही याचा त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भ्रमाला 'ब्रेन फॉग' असंही म्हटलं जातं. जे दीर्घ कोविडचे लक्षण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्मरणशक्ती किंवा एकाग्रतेमध्ये समस्या येतात तेव्हा त्याला दीर्घ कोविडचे लक्षण म्हणून ओळखलं जातं.7 / 15लक्ष नसणे, विचारात अडचण, गोंधळ, विसरणे, मानसिक थकवा जाणवणे ही लाँग कोविडची लक्षणे आहेत. जगभरातील अनेक देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 15कोरोनाच्या ओमाक्रॉन व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट BA.2 चौथ्या लाटेचा इशारा देत आहे. त्याचवेळी, आता WHO ने कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार XE बद्दल सांगितले आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेत दातांना मोठा धोका निर्माण झाला आहे. 9 / 15फुफ्फुस, पोट यानंतर आता कोरोना दातांवर अटॅक करत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे दात आणि हिरड्यांचेही नुकसान होत आहे, ज्याची लक्षणे दिसू लागली आहेत, त्याला 'कोविड टीथ' असं नाव दिलं जात आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. 10 / 15कोरोनाच्या चौथ्या लाटेपूर्वी ही लक्षणे समजून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हिरड्यांमध्ये वेदना, जबडा किंवा दात दुखणे, हिरड्यांमध्ये रक्त जमा होणं, ताप, खोकला, थकवा ही सहा लक्षणं दिसल्याचं वेळीच सावध व्हा. 11 / 15दात किंवा हिरड्याचे दुखणे कोणालाही त्रास देऊ शकते, परिस्थितीत वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. काही देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. 12 / 15आता हातांच्या बोटांवरून कळणार कोरोनाचा कितपत धोका आहे. रिसर्चमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शास्त्रज्ञांनी एक रिसर्च केला आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, व्यक्तीची नखं पाहून देखील व्यक्तीला कोरोना होण्याचा धोका किती आहे हे कळते. 13 / 15नखांबरोबर एखाद्या व्यक्तीच्या बोटांवरून त्याला कोरोनाचा किती धोका आहे हे कळू शकतं.मीडिया रिपोर्ट्स आणि रिसर्चनुसार, ज्या लोकांची अनामिका (Ring Finger) तर्जनीपेक्षा (Index Finger) लहान आहे त्यांना गंभीर कोरोनाचा धोका जास्त असू शकतो. 14 / 15तज्ञांच्या मते, पोलंडमधील लॉड्झ मेडिकल युनिव्हर्सिटी आणि स्वीडनमधील कॅरोलिंस्का युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील संशोधकांच्या टीमने कोविड-19 ची लागण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या हार्मोन पातळीचा बरे होण्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी एक रिसर्च केला. 15 / 15छोटी अनामिका असलेल्या लोकांना कोरोनामुळे लवकरच रुग्णालयात दाखल करावे लागते असं देखील म्हटलं आहे. ज्या लोकांच्या उजव्या आणि डाव्या हाताच्या बोटांमध्ये फरक आहे त्यांच्यामध्येही व्हायरसची गंभीर लक्षणे आढळून आली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications