Coronavirus News: know how quickly can bharat biotech vaccine hit the market
दिलासादायक! भारत बायोटेक कंपनीची लस बाजारात कधीपर्यंत उपलब्ध होणार? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 3:34 PM1 / 9कोरोनाच्या लसीबाबत जगभरात संशोधन सुरू आहे. दरम्यान भारतातून एक चांगली बातमी समोर येत आहे. कोरोना व्हायरसची पहिली लस भारतात तयार होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच या लसीचे मानवी परिक्षण सुरू होणार आहे. पण ही लस बाजारात कधीपर्यंत येणार याबाबत सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. आज आम्ही तुम्हाला या लसीबाबत माहिती देणार आहोत. 2 / 9साधारणपणे लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी ८ ते १० वर्षांचा कालावधी लागत. त्यात लसीच्या पहिल्या टप्प्यातील परिक्षण १,००० ते ३,००० हजार लोकांवर करण्यात येते. ही प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत दोन वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतरच्या टप्प्यात १५,०० ते ३०,००० हजार लोकांवर परिक्षण करण्यात येतं. 3 / 9त्यानंतर अधिकृत संस्थेद्वारे लसीचे परिक्षण केले जाते. पण लसीची चाचणी लवकरात लवकर करायची असेल तर ५० ते ५०० लोकांवर चाचणी करण्यात येते. यासाठी ४ महिन्यांचा कालावधी लागतो.4 / 9नंतर लसीच्या ट्रायलचे डोस तयार केले जातात. ५०० ते १०० लोकांवर ही चाचणी केली जाते. यात ४ महिन्याचा कालावधी लागतो. 5 / 9तिसऱ्या टप्प्यातील चाचणी वेगवेगळ्या अनुवांशिक आधारांवर केली जाते. हे परिक्षण आजाराची व्यापकता आणि सरकारच्या शिफारसीवर अवलंबून असते. हे परिक्षण १०००० ते ५०००० हजार लोकांवर करण्यात येते. यासाठी लागणारा वेळ लसीच्या डोजवर अवलंबून असतो. साधारणपणे ४ ते २ महिन्यांच्या कालावधीत या लसीचे परिणाम दिसून येतात. 6 / 9कोरोना व्हायरसच्या लसीबाबत नियामक संस्थांनी पहिल्या दुसऱ्या आणि टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी दिली आहे. तिसरा टप्पा हा लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निकालांवर अवलंबून असतो. 7 / 9त्यानंतर तपासणी आणि पडताळणीसाठी लसीचे रिजल्ट्स नियामक संस्थांना पाठवले जातात. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. 8 / 9भारत बायोटेक कंपनीने आतापर्यंत लस तयार करण्यासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. कोरोनाची लस साधारणपणे २०२१ च्या शेवटापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.9 / 9जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार आता १५० लसी या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्यातील १० लसी आता अडवांन्स स्टेजमध्ये आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications