शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चिंताजनक! कोरोना लसीसाठी 'असा' शॉर्टकट वापरल्यास संपूर्ण जगाचा जीव धोक्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 1:17 PM

1 / 10
कोणतीही लस तयार करण्यासाठी दीर्घकालीन प्रकियेतून जावं लागतं. जगभरातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी प्रयत्नरत असताना रशियाने संपूर्ण चाचणी प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच लस तयार केल्याचे घोषित केलं आहे. लस तयार करण्यासाठी अतिघाई करणं जीवघेणं ठरू शकतं असं तज्ज्ञांचे मत आहे. पोलियोच्या लसीबाबत अशीच स्थिती उद्भवल्याचे तज्ज्ञ म्हणाले.
2 / 10
१९५५ मध्ये घाईघाईत तयार करण्यात आलेल्या लसीमुळे ७० हजारांपेक्षा जास्त लोकांना शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला होता. अमेरिकेच्या वैद्यकिय इतिहासातील सगळ्यात मोठी दुर्घटना म्हणून या घटनंकडे पाहिले जाते. त्यावेळी पोलीओच्या आजारानं संपूर्ण जगाला प्रभावित केलं होतं. १९५२ मध्ये अमेरिकेत पोलियोची सगळ्यात मोठी लाट आली तेव्हा ५६ हजारालोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला होता.
3 / 10
त्यावेळी पोलियोपासून बचावासाठी नाकात एसिड स्प्रे टाकला जात होता. यामुळे पोलिया पूर्णपणे बरा होत नसून मुलांची वास घेण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट व्हायची. फक्त लहान मुलांनाच नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांनाही वयाच्या ३९ व्या वर्षी पोलिओचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांना पॅरालिसीसची समस्या उद्भवली.
4 / 10
फिलाडेल्फियाच्या वॅक्सिन सेंटरचे वैज्ञानिक Paul A. Offit यांनी The Cutter Incident या पुस्तकात या घटनेबाबत उल्लेख केला आहे. त्यावेळी लोकांना पोलियो काय आहे याबाबत कल्पना नव्हती. सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी लोकांना समस्यांचा सामना करावा लागत होता.
5 / 10
त्यामुळे तज्ज्ञ लस तयार करण्याच्या कामाला लागले होते. १९५१ मध्ये पिटरबर्गचे तज्ज्ञ Jonas Salk यांनी पोलियोची लस तयार करण्यासाठी सांगितले. काही महिन्यातच लस तयार झाल्याचा दावा केला. अनेक फार्मा कंपन्यांना औषध तयार करण्यासाठी लायसेंस मिळाले. Cutter Laboratories यापैकी एक होती. ही लस पूर्णपणे सुरक्षित नव्हती.
6 / 10
माकडांवर करण्यात आलेल्या परिक्षणातून ही लस सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. ही लस तयार झाल्यानंतर (१६५,००० डोज “POLIO VACCINE: RUSH”)जगभरातील देशांमध्ये वितरण करण्यात आलं होतं.
7 / 10
१९५५ मध्ये ही लस ४ लाख २० हजार मुलांना देण्यात आली होती. काही आठवड्यातच लसीचे नकारात्मक परिणाम दिसून आले होते.
8 / 10
वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार ४० हजार लोकांवर लसीचे नकारात्मक परिणाम झाले. त्यातील ५ जणांना आपली जीव गमवावा लागला. दोन महिन्यांच्या आत या लसीचे लसीकरण थांबवण्यात आलं.
9 / 10
सध्या जगभरात कोरोनाची माहामारी आहे. घाईघाईत लस तयार केल्यानं मोठी किंमत मोजावी लागू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कारण असुरक्षित लसीने लसीकरण केल्यानं धोका दुप्पटीनं वाढत असल्याच्या अनेकदा दिसून आलं आहे.
10 / 10
सध्या जगभरात कोरोनाची माहामारी आहे. घाईघाईत लस तयार केल्यानं मोठी किंमत मोजावी लागू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कारण असुरक्षित लसीने लसीकरण केल्यानं धोका दुप्पटीनं वाढत असल्याच्या अनेकदा दिसून आलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सInternationalआंतरराष्ट्रीय