CoronaVirus News Marathi : America moderna coronavirus vaccine high cost
CoronaVirus News : अमेरिकन कंपनीची कोरोनाची लस खिशाला कात्री लावणार; जाणून घ्या किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 1:06 PM1 / 10संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या माहमारीतून बाहेर येण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. फायनंशियल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील कंपनी मॉडर्ना इंक लस तयार केल्यानंतर एका कोर्ससाठी ३ हजार ७०० रुपयांपासून ४ हजार ५०० रुपयांपर्यंत खर्च वसूल करेल अशी योजना आखली जात आहे. 2 / 10फायजर कंपनी आणि बायोटेक कंपनीच्या तुलनेत मॉडर्ना लसीची किंमत खूप जास्त आहे. जवळपास ८०० रुपयांनी अधिक किंमत मोजावी लागणार आहे. मॉडर्ना कंपनीच्या लसीच्या दोन डोससाठी जवळपास ३ हजार ७०० ते ४ हजार ५०० इतका खर्च लागू शकतो.3 / 10अमेरिकेतील फायजर कंपनी आणि जर्मन कंपनी यांनी कोरोनाची लस तयार करण्यासाठी १५ हजार कोटींचा व्यवहार केला आहे. 4 / 10याद्वारे ५ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच लस दिली जाणार आहे. 5 / 10रिपोर्टनुसार अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीकडून जास्त लोकसंख्या असलेल्या देशात ३ हजार ७०० ते ४ हजार ५०० रुपये वसूल करण्याचा विचार केला जात आहे. 6 / 10 प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीच्या वितरणासाठी अमेरिकन सरकारद्वारे चर्चा सुरू करण्यात आली आहे. प्रवक्त्यांनी गोपनियता ठेवत किमतीबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही.7 / 10रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार मॉडर्ना कंपनीच्या कोरोना व्हायरसच्या लसीची किंमत निश्चित होणं अजूनही बाकी आहे. कंपनीने दिलेल्यामाहितीनुसार पूर्णपणे खर्च भरून निघेल अशी लसीची किंमत ठेवण्यात येणार आहे. 8 / 10. तेच जॉनसन एँड जॉनसन नॉट-फॉर-प्रॉफिट या तत्वावर लसीची विक्री करण्याचा विचार करत आहेत. 9 / 10ब्रिटिश स्विडिश कंपनी एस्ट्राजेनका ने जवळपास ९ कोटी रुपयांना अमेरिकेला ३० कोटी लस पुरवण्याचा करार केला आहे. त्यामुळे एक्स्ट्राजेनका या लसीच्या प्रत्येक डोजची किंमत ३०० रुपयांपर्यंत असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.10 / 10अमेरिकेने लस तयार करण्याासठी ऑपरेशन वार्प स्पीड प्रोग्राम सुरू केला आहे. मॉडर्ना कंपनीची लस तयार करण्यासाठी सरकारकडून ७ हजार ४७६ रुपयांचा फंड देण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications