शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : धुम्रपानामुळे कोरोना विषाणूंपासून बचाव होतो? जाणून घ्या फॅक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 5:36 PM

1 / 10
कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. या व्हायरसच्या प्रसाराबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज सुद्धा आहेत. आहारासंबंधी अनेक पदार्थांचे सेवन करताना लोकांना भीती वाटत आहे. गेल्या काही दिवसात शास्त्रज्ञांकडून दावा केला जात होता की, धुम्रपान करत असलेल्या लोकांना कोरोनाची भीती कमी असते. या दाव्याबाबत युनिव्हरसिटी ऑफ कॅलिर्फोनिया(UCSF) ने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
2 / 10
UCSF च्या सेंट्रर फॉर टोबॅको कंट्रोल रिसर्च एंड एजुकेशन' चे प्रोफेसर ग्लँट्स यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, धुम्रपान करत असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिका केलेल्या काही रिसर्चमध्ये असं दिसून आलं की नॉन स्मोकरर्सच्या तुलनेत सिगारेट ओढत असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्याचा धोका ३० टक्क्यांनी जास्त आहे.
3 / 10
एका रिसर्च रिपोर्टनुसार धुम्रपान करत असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर वाचण्याची शक्यता खूप कमी असते. धुम्रपान करत असलेल्या व्यक्तीच्या शरीराला कोरोना जलद गतीने नुकसान पोहोचवतो. या रिपोर्टनुसार रुग्णालयात दाखल झालेल्या धुम्रपान करत असलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 / 10
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या धुम्रपान करत असलेल्या लोकांना मृत्यूदर जास्त होता. धुम्रपान करत असलेल्या तब्बल ४७ टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर धुम्रपान सोडलेले ३१ टक्के लोक कोरोनाशी लढत आहेत. सिगारेट पीत नसलेल्या ३५ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 / 10
सिगारेटचं सेवन करत असलेल्या लोकांना जीवघेण्या आजारांचा धोका नसतो. अशा स्वरुपाचे अनेक रिसर्च गेल्या काही दिवसात समोर आले होते. परंतु या नवीन रिसर्चने चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे.
6 / 10
एका आठवड्यापूर्वी इंग्लंड युनिव्हरसिटीतील संशोधकांनी सुद्धा दावा केला होता की, स्मोकिंग करत असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका नसतो. पण आता संशोधक हा भ्रम दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
7 / 10
इटलीच्या एका रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या ४४१ आहे. यात धुम्रपान करत असलेल्यांची संख्या ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. इतर देशांच्या तुलनेने या देशातील लोकसंख्येच्या १ चर्तुथांश लोकांना सिगारेटचं व्यसन आहे. या गोष्टीमुळे काही संशोधक स्मोकिंगमुळे कोरोनााचा धोका कमी होतो या दाव्यावर ठाम आहेत.
8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सSmokingधूम्रपान