शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : आतड्यांमध्ये वेगाने होत आहे कोरोना विषाणूंचा प्रसार, तज्ञांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 5:34 PM

1 / 10
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार पसरला आहे. कोरोनाची विषाणूची लागण झाल्यामुळे जगभरात दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. कोरोनावर औषधं किंवा लस येण्यासाठी शास्त्रज्ञांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा शरीरावर होणारा परिणाम यावर तज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
2 / 10
स्कॉटलँड स्कूल ऑफ लाईफ सायन्सनी कोरोना व्हायरसच्या काही प्रिंट्स फोटो दाखवले आहेत. त्यात असं दिसून येत आहे कोरोना व्हायरसचं आतड्यांवर फक्त संक्रमण होत नसून कोरोना आतड्यांमध्ये वेगाने पसरत जातो.
3 / 10
माणसाच्या शरीराला संक्रमित करून आतड्यांपर्यंत पोहोचत असलेला कोरोना व्हायरस पांढऱ्या रंगाचा दिसतो. कोरोनाचे निरक्षण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अल्ट्रा पॉवरफुल मायक्रोस्कोपचा वापर केला.
4 / 10
शरीरातील कोरोना व्हायरसची माहिती देणारे हे फोटो ३० ते ५० गीगाबाईट्सचे आहेत. स्कूल ऑफ लाईफ सायन्सचे क्वारंटाईन सेल बायोलॉजी प्रोफेसर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आतड्यांपर्यंत पोहोचून शरीराचं नुकसान करत असतो. आतड्यांमध्ये व्हायरसची संख्या वेगाने वाढत जाते.
5 / 10
संशोधकांनी यावेळी माणसांच्या आतड्यांचे परिक्षण करत असताना एका तपासणी ट्यूबमध्ये यशस्वीरित्या व्हायरसच्या नमुन्यांना विकसीत केलं आहे. यानंतर व्हायरसचा परिणाम आतड्यांवर कशा पध्दतीने होत आहे. यावर परिक्षण करण्यात येईल.
6 / 10
रिसर्चकर्त्यांनी कोरोना रुग्णांमध्ये डायरिया यांसारखे गॅस्ट्रोइंटेस्टेनल समस्यासुद्धा दिसून आल्या आहेत. कोरोना व्हायरसची लक्षणं श्वसनप्रणालीशी जोडलेले असतात.
7 / 10
सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समधून कोरोनाचा प्रसार होतो. त्यातून रुग्णांना श्वास घेण्याासाठी त्रास होणं, खोकला, सर्दी अशा समस्या उद्भवतात.
8 / 10
तीनपैकी एका कोरोना रुग्णाला गॅस्ट्रोइंटेस्टेनस ट्रॅकची लक्षणं दिसत असल्याचा दावा केला आहे. श्वसनासंबंधी समस्या पूर्णपणे ठिक झाल्यानंतरही मलाद्वारे कोरोना व्हायरस दिसून येऊ शकतो. असं शास्त्रज्ञानी सांगितले आहे.
9 / 10
यातून तज्ञांना दिसून आलं की कोरोना फिकल ओरल ट्रान्समिशनमुळे कोरोना लोकांमध्ये जास्त पसरतो.
10 / 10
सध्या जगभरातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांमध्ये दिसून येत असलेल्या नवीन लक्षणांवर शास्त्रज्ञांचा रिसर्च सुरू आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस