CoronaVirus News Marathi : This new drug have 99 efficacy to fight covid19 myb
'या' नवीन लसीने कोरोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा?; ३ देशात क्लिनिकल ट्रायल सुरु By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 11:08 AM1 / 10कोरोनाच्या माहामारीत आता अनेक देश लॉकडाऊन उठवण्याच्या तयारीत आहेत. भारतातही लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू शकतो अशी भीती सगळ्यांचाच मनात आहे. बिझनेस स्टॅडर्डच्या वेबसाईट्ने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार एका कंपनीने कोरोनाची लस तयार करण्याचा दावा केला आहे. 2 / 10तसंच ही लस कोरोनाच्या विषाणूंना मारण्याासाठी परिणामकारक ठरू शकते. असं ही सांगितले आहे. या कंपनीने दिलेल्या माहीतीनुसार या लसीने कोरोना विषाणूंना ९९ टक्के नष्ट करता येऊ शकतं. 3 / 10इंग्लँडमध्ये चाचणी सुरू आहे : ही औषध तयार करणारी कंपनी बायोटेक ने दावा केला आहे की, त्यांनी कोरोना विषाणूंशी लढणारी लस तयार केली आहे. ही लस ९९ टक्के कोरोनाला मारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 4 / 10चीनच्या औषध निर्मीती करत असलेल्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या लसीचे दोन टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. या लसीचे परिणाम जाणून घेण्यासाठी १०० रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल करण्यात येणार आहे. लवकरच या लसीचं तीसरं क्लिनिकल ट्रायल सुद्धा पूर्ण होणार आहे. 5 / 10कोरोनाच्या माहामारीसाठी लढण्याकरीता जगभरातील १० लसी शेवटच्या टप्प्यातील ट्रायलमध्ये आहेत. साधारणपणे यांतील अर्ध्यापेक्षा जास्त लसींचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 6 / 10अमेरिकन कंपनी मोडेर्नोद्वारे तयार लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. याव्यतिरिक्त इंग्लँडमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हरसिटीद्वारे तयार लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. 7 / 10पुढील दोन आठवड्यात रुसमध्ये सुद्धा हे ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. 8 / 10कोरोनाची माहामारी संपूर्ण जगभरात दिवसेंदिवस वेगाने पसरत आहे. ६० लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोनाच्या संक्रमणाबाबत अनेकांनी धोका वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. 9 / 10अशा स्थितीत या लसीने आशेचा किरण दाखवला आहे. 10 / 10अशा स्थितीत या लसीने आशेचा किरण दाखवला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications