CoronaVirus News Marathi : Obese people should quarantine longer when infect with covid 19 myb
चिंताजनक! 'या' लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त; आयसोलेशनसाठी १४ दिवस पुरेसे नाहीत By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 6:33 PM1 / 10कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन लाख ८० हजारांपेक्षा जास्त आहे. आरोग्य तज्ञांनी कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी १४ दिवस आयसोलेशन करण्याचे सांगितले आहे. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनतात असं दिसून आलं की लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना आयसोलेशनसाठी १४ दिवस पुरेसे नाहीत. 2 / 10इटलीच्या संशोधनकांच्या एका गटाने कोरोनाचे संक्रमण झालेल्या लठ्ठ रुग्णांना २८ दिवस म्हणजेचं दुप्पट क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. इनफ्लूएंजा इंफेक्शनवर करण्यात आलेल्या संशोधनाला अनुसरून वैज्ञानिकांनी लठ्ठ लोकांना असा सल्ला दिला आहे. 3 / 10संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं संक्रमण होतं. तेव्हा रुग्णासाठी जास्त संवेदनशील स्थिती असते. दीर्घकाळापर्यंत या व्हायरसचा धोका असू शकतो. हा रिसर्च नेचर पब्लिक हेल्थ इमरजेंसी कलेक्शनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 4 / 10इटलीतील दोन संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, कोरोना व्हायरस आणि लठ्ठपणा यातील इंटरॅक्शन इंफ्लूएंजासारख्या व्हायरसचा लठ्ठ लोकांवर कसा प्रभाव पडला या गोष्टींवर अवलंबून आहे. 5 / 10इंफ्लूएंजा वायरसचा धोका सडपातळ लोकांच्या तुलनेत लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना जास्त असतो. म्हणजेच ओव्हरवेट असलेल्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. इंफेक्शनचे झाल्यास अशा लोकांना जास्त दिवस निरीक्षणाखाली ठेवणं गरजेचं आहे. 6 / 10व्हायरसच्या इन्फेक्शनचा धोका लठ्ठ लोकांना जास्त असतो. कारण त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांचं शरीर व्हायरसशी लढू शकत नाही. परिणामी त्यांचे शरीर लगेच व्हायरसचं शिकार होतं. 7 / 10 क्रॉनिकल डिसीज तसंच शरीराला सूज येणं, वजन वाढणं ही लठ्ठपणाची लक्षणं आहेत. यामुळे हळूहळू रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. लठ्ठ लोकांचे शरीर कोरोना व्हायरसशी लढू शकत नाही. 8 / 10म्हणून संशोधकांनी असं मत व्यक्त केलं आहे की, जोपर्यंत कोरोनाची लस किंवा औषध उपलब्ध होत नाही. तोपर्यंत लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण झाल्यास दुप्पट कालावधीसाठी म्हणजेच २८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवायला हवं.9 / 10म्हणून संशोधकांनी असं मत व्यक्त केलं आहे की, जोपर्यंत कोरोनाची लस किंवा औषध उपलब्ध होत नाही. तोपर्यंत लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण झाल्यास दुप्पट कालावधीसाठी म्हणजेच २८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवायला हवं.10 / 10म्हणून संशोधकांनी असं मत व्यक्त केलं आहे की, जोपर्यंत कोरोनाची लस किंवा औषध उपलब्ध होत नाही. तोपर्यंत लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण झाल्यास दुप्पट कालावधीसाठी म्हणजेच २८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवायला हवं. आणखी वाचा Subscribe to Notifications