शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : बापरे! पहिल्यांदाच समोर आला कोरोना विषाणूचा 'असा' प्रकार; डॉक्टरही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 10:56 AM

1 / 9
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार पसरवला आहे. मॅक्सिकोमध्ये कोरोना विषाणूंचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. ट्रिपलेट्स म्हणजेच तिळं जन्माला आलं आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे जन्माला आलेली तीन्ही मुलं कोरोना पॉजिटिव्ह आहे.
2 / 9
या लहानग्यांच्या आई वडिलांना कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेलं नाही. या प्रकारामुळे डॉक्टर हैराण झाले असून आरोग्य अधिकारी असं का झालं असावं यावर अधिक विचार करत आहेत.
3 / 9
आरोग्य अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असा प्रकार कधी पाहिला नव्हता आणि ऐकलाही नव्हता. या तिळ्यांमध्ये दोन मुली आणि एक मुलगा आहे. जन्माला आल्यानंतर चार तासांनी लुइस पोटोसीमध्ये यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांनंतर त्यांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला.
4 / 9
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कदाचित या तीळ्यांची आई असिम्प्टोमॅटिक कोरोना रुग्ण असावी. त्यामुळे लहान मुलांमध्ये हा आजार पसरला. तिळ्यांचे रिपोर्ट आल्यानंतर आई वडीलांची चाचणी करण्यात आली. पण या दोघांचीही चाचणी निगेटिव्ह आली आहे.
5 / 9
आरोग्य सचिव मोनिका रंगेल यांनी दिलेल्या माहितीनुसार चिमुकल्यांच्या आई वडिलांचे टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर या प्रकारात विशेष लक्ष दिले जात आहे. या मुलांचा सांभाळ करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, १७ जुनला जन्माला आलेले तीन्ही मुलं आता निरोगी आणि सुरक्षित आहेत.
6 / 9
. त्यापैकी एका मुलाला निमोनियाची समस्या होती. पण आता त्या मुलाची प्रकृती चांगली आहे.
7 / 9
डॉक्टर मोनिका रंगेल यांनी सांगितले की, हे तिळं आता डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असून काही दिवस रुग्णालयातच असणार आहेत.
8 / 9
मॅक्सिकोमध्ये सध्या १ लाख ९० हजार कोरोनाबाधित असून २३ हजार ३७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
9 / 9
(image credit- Daily O )
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdoctorडॉक्टर