शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात 'हे' लोक व्हायरसपासून जास्त सुरक्षित; रिसर्चमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 4:27 PM

1 / 13
जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 49 कोटींचा टप्पा पार केला असून 61 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशात गंभीर परिस्थिती आहे.
2 / 13
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावरील योग्य त्या उपचारांबाबत जगभरात संशोधन सुरू आहे. रिसर्चमधून सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या संकटात काही लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
3 / 13
ज्या लोकांना एकदा कोरोनाची लागण झाली आहे आणि ज्यांनी लसीचे दोन्ही डोस देखील घेतले आहेत असे लोक हे कोरोना आणि इतर व्हायरसपासून अधिक सुरक्षित आहेत अशी माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमध्ये खुलासा करण्यात आला आहे.
4 / 13
'द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज' मध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चसाठी शास्त्रज्ञांनी 2020 आणि 2021 मध्ये ब्राझीलमधील दोन लाख लोकांच्या आरोग्य डेटाचा रिसर्च केला. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोविडमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
5 / 13
रिसर्चमध्ये, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की ज्या लोकांना आधीच कोरोनाचे निदान झाले आहे त्यांना फायझर आणि अॅस्ट्राझेनेका लसींद्वारे कोविडमुळे हॉस्पिटलायझेशन किंवा मृत्यू टाळण्यासाठी 90% पर्यंत इम्यूनिटी मिळाली आहे.
6 / 13
ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमोद कुमार गर्ग यांनी कोरोनापासून नैसर्गिकरित्या जन्माला आलेली शारीरिक क्षमता आणि लसीपासून निर्माण झालेली प्रतिकारशक्ती यामुळे हायब्रीड इम्यूनिटी निर्माण होते. ते इतर नवीन विकसित होणाऱ्या व्हायरसपासून संरक्षण देखील देईल असं म्हटलं आहे.
7 / 13
स्वीडनमध्ये असाच एक रिसर्च करण्यात आला आहे जिथे ऑक्टोबर 2021 पर्यंत देशातील कोविड रुग्णांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे आढळून आले की जे कोविडमधून बरे झाले आहेत त्यांची पुढील 20 महिन्यांपर्यंत कोविड विरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती आहे.
8 / 13
ज्या लोकांमध्ये लसीच्या दोन डोसमुळे हायब्रिड इम्युनिटी विकसित झाली होती त्यांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका 66% कमी होता. कतारमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये ओमायक्रॉनच्या हायब्रिड इम्युनिटीच्या प्रभावाबाबत माहिती देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 13
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला असून कोट्यवधी लोकांना लागण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
10 / 13
कोरोना महामारी अजून संपलेली नाही. सर्व आरोग्य संस्था अजूनही त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन संशोधन करत आहेत. कोरोनाची अनेक (Several symptoms) लक्षणे सूचीबद्ध करण्यात आली आहेत. पण एक लक्षण आहे ज्याची फारशी चर्चा झालेली नाही.
11 / 13
थंडी वाजणे, सततचा खोकला, वास किंवा चव न समजणं ही कोरोनाची मुख्य लक्षणे आहेत. यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं, आजारी वाटणे, थकवा, वेदना, घसा खवखवणे, डोकेदुखी, नाक वाहणे, भूक न लागणे आणि अतिसार ही लक्षणं त्यात सूचीबद्ध केली आहेत.
12 / 13
अधिकृतपणे सूचीबद्ध नसलेले लक्षण म्हणजे 'भ्रम'. रोग नियंत्रण केंद्र (CDC) आणि WHO या दोन्ही संस्थांनी भ्रम हे कोरोना व्हायरसचे लक्षण म्हणून सूचीबद्ध केले आहे. WHO च्या यादीनुसार, भ्रम हे 'गंभीर लक्षण' म्हणून सूचीबद्ध केलं गेलं आहे.
13 / 13
कोणालाही याचा त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भ्रमाला 'ब्रेन फॉग' असंही म्हटलं जातं. जे दीर्घ कोविडचे लक्षण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्मरणशक्ती किंवा एकाग्रतेमध्ये समस्या येतात तेव्हा त्याला दीर्घ कोविडचे लक्षण म्हणून ओळखलं जातं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस