CoronaVirus News : Pm narendra modi on coronavirus vaccine distribution system
पॉझिटिव्ह बातमी! देशाच्या कानाकोपऱ्यात 'अशी' पोहोचणार कोरोनाची लस; PM मोदींनी सांगितला प्लॅन By manali.bagul | Published: October 18, 2020 9:44 AM1 / 8कोरोना व्हायरसने गेल्या अनेक महिन्यांपासून कहर केला आहे. आता कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. कारण लॉकडाऊनमुळे लोकांच्या जीवनावर प्रतिकुल परिणाम झालेला दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची लस देशाच्या सर्व भागात दूरवरपर्यंत पोहोचावी अशी इच्छा पंतप्रधान मोदींची आहे. 2 / 8त्यांनी व्यवस्थेला दिलेल्या आदेशानुसार ज्या प्रमाणे देशात निवडणूकांच्यावेळी व्यवस्था पाहिली जाते. त्याचप्रमाणे लसीचा पुरवठा, वितरण, लसीकरण याची व्यवस्था व्हायला हवी. लसीकरण अभियानात सरकारी व्यवस्थेच्या भागिदारीत नागरी समाजाचाही सहभाग असणं आवश्यक आहे. मोदींनी कोरोनाची सद्यस्थिती आणि लसीचे लसीकरण याबाबत एका उच्चस्तरीय बैठक घेतली होती.3 / 8 यादरम्यान मोंदींनी सण उत्सवांच्या काळात निष्काळजीपणा टाळण्याचे आवाहने केले असून लोकांना मास्कच्या वापरणं, हात धुणं, सोशल डिस्टेंसिंग पाळण्याबाबत आवाहन केलं आहे. 4 / 8पीएम मोदी यांनी लसीच्या वितरणावर भर देत सांगितले की, संपूर्ण व्यवस्था ही आयटीवर आधारित असावी. आरोग्यसेवेसाठी दीर्घकाळ परिणामकारक ठरेल अशाप्रकारे या सिस्टीमला तयार करण्यात येणार आहे. 5 / 8पीएम मोदींनी सांगितले की, देशातील भौगोलिक स्थिती आणि विविधता लक्षात घेता लस लवकरत लवकर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 6 / 8लॉजिस्टिक्स, डिलिव्हरी आणि एडमिनिस्ट्रेशमध्ये प्रत्येक पाऊल हे सावधगिरीने पडायला हवं. कोल्ड स्टोरेज चेन्स, डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क, मॉनिटरिंग मॅकेनिज्म, एडवांस असेसमेंट आणि वायल्स तसंच मशिन्स यांबाबात आधीच योजना तयार असायला हव्यात.7 / 8पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितले की, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये घट होत असली तर माहामारी रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे.8 / 8आयोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, पंतप्रधानांचे प्रमुख सचिव पीके मिश्रा, डॉ. वीके पॉल, प्रधान, वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन , वरिष्ठ अधिकारी यांसह अन्य विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आणखी वाचा Subscribe to Notifications