शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : डेल्टा असो किंवा ओमायक्रॉन, 'हा' खास मास्क कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटपासून देईल 83% संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 5:23 PM

1 / 14
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सर्वाधिक कहर झाला आहे. ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी त्यात वेगाने पसरण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच ते कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनले.
2 / 14
जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) जगभरातील मोठ्या आरोग्य संघटनांनी कोरोनाला हलके न घेण्याचा सल्ला दिला आहे आणि लोकांना कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
3 / 14
कोरोना व्हायरसवर कायमस्वरूपी इलाज नाही, त्यामुळे थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला कोरोनाचा रुग्ण बनवू शकतो. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे, लसीकरण करणे आणि इतर सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
4 / 14
मास्क हे कोरोनाविरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र मानले जाते. पण कोणता मास्क चांगला असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी मास्क कोणता? याचे उत्तर एपिडेमियोलॉजिस्ट फहीम युनूस यांनी दिले आहे.
5 / 14
डॉक्टर फहीम युनूस यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी KN95 मास्क 83% पर्यंत संरक्षण करू शकतो असं म्हटलं आहे. नवीन रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरल्याने SARS-CoV-2 संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.
6 / 14
कोणताही फेस मास्क घरामध्ये वापरला जाऊ शकतो आणि संरक्षण देतो. तथापि N95/KN95 रेस्पिरेटर वापरणाऱ्यांना अधिक संरक्षण मिळते. यानंतर सर्जिकल मास्क आणि नंतर कापडी मास्क असू शकतो.
7 / 14
संशोधकांनी रिसर्चमध्ये नमूद केले आहे की कापडाचे मास्क 56%, सर्जिकल मास्क 66% आणि N95/KN95 83% ने तुमचे संरक्षण करू शकतात. याचा अर्थ असा की जर तुम्हाला कोरोना व्हायरसचा धोका कमी करायचा असेल तर तुम्ही हा मास्क घालायला सुरुवात केली पाहिजे.
8 / 14
सीडीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे सांगण्यात आले आहे की जर तुम्ही कापडी मास्क घातला असेल तर त्याखाली डिस्पोजेबल मास्क घाला. पुन्हा वापरलेले मास्क होताच किंवा दिवसातून एकदा तरी धुवावेत.
9 / 14
तुमच्याकडे डिस्पोजेबल फेस मास्क असल्यास, तो घातल्यानंतर फेकून द्या. N95 हा मास्क सर्जिकल मास्कपेक्षा जास्त प्रभावी आहे. ते एकाधिक लेयर फिल्टरसह सुसज्ज आहेत आणि फिटिंगमध्ये देखील घट्ट आहेत.
10 / 14
हे मास्क लहान आणि मोठ्या दूषित पदार्थांपासून 95 टक्के संरक्षण करतात. फिट असल्यामुळे, लिकेजची शक्यता खूपच कमी आहे. या मास्कमध्ये तीन थर असतात, जे लहान कणांना दूर ठेवतात.
11 / 14
सीडीसीच्या मते, संसर्ग नसलेल्या व्यक्तीला चेहरा झाकल्याशिवाय संक्रमित व्यक्तीच्या जवळ येण्यापासून संसर्ग होण्यासाठी फक्त 15 मिनिटे लागतात. जर दोघांनी कापडाचे मास्क घातले असतील तर त्यांना संसर्ग होण्यास 27 मिनिटे लागतात.
12 / 14
दोघांनी घातलेला सर्जिकल मास्क 30 मिनिटांपर्यंत संरक्षण देतो. पण जेव्हा दोघेही N95 मास्क परिधान करतात तेव्हा संरक्षण वेळ अडीच तासांपर्यंत वाढतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
13 / 14
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.
14 / 14
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 67,597 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,188 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच रिसर्चमधून नवनवीन माहिती समोर येत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन