CoronaVirus News : What is long covid and its symptoms coronavirus wave symptoms
CoronaVirus News : धोका वाढला! शरीरात १२ आठवडे पडून राहतोय कोरोना; तज्ज्ञांनी सांगितली लॉन्ड कोविडची लक्षणं..... By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 3:34 PM1 / 9कोरोना व्हायरसची माहामारी अजूनही पूर्ण नष्ट झालेली नाही. कोरोना व्हायरसची लस मिळाल्यामुळे लोकांमध्ये दिलासादायक वातावरण असलं तरी अजूनही कोरोनाच्या प्रसाराचा वेग दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. समोर आलेल्या रिसर्चनुसार कोरोनातून बाहेर आल्यानंतर काही महिन्यांपर्यंत याची लक्षणं दिसून येऊ शकतात.2 / 9लॉन्ग कोविड अशी स्थिती आहे. यात व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर तसंच चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही लक्षणं दिसून येतात. नॅशनल इंस्टिट्यूट फॉर हेल्थ एंड केअर एक्सीलेंसनं (National Institute for Health and Care Excellence, NICE) दिलेल्या माहितीनुसार १२ आठवड्यांपेक्षा जास्तवेळी ही लक्षणं दिसू शकतात. तर काहींच्या मते ८ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस लक्षणं असल्यास लॉन्ग कोविडचा संकेत असू शकतो.3 / 9लॉन्ग कोविडमुळे दीर्घकाळ आजारी असलेल्या लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. फुफ्फुसं, हृदय, किडनी किंवा मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. 4 / 9नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ अँण्ड केअरनं दिलेल्या महितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर लॉन्ग कोविड १२ आठवड्यांपर्यंत राहतो.5 / 9ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स ओएनएसनं दिलेल्या माहितीनुसार ५ कोरोना संक्रमित रुग्णांना १ ते ५ आठवड्यांपर्यंत लक्षणं दिसून आली होती. १० पैकी एका संक्रमित व्यक्तीमध्ये १२ आठवड्यांपेक्षा जास्तवेळ कोरोनाची लक्षणं दिसून आली होती.6 / 9एका अभ्यासात ५ हजार १६३ लोकांवर परिक्षण करण्यात आलं होतं. जे लोक सुरूवातीपासूनच वेगवेगळ्या आदारांनी बाधित होते. 7 / 9त्यातील ७५ टक्के लोक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. तर १०० लोकांमधील आजाराची लक्षणंही कोरोनाची संबंधित होती. 8 / 9इंडियाना युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्राध्यापक नताली लँबर्ट यांनी सांगितले की, ''दिवसेंदिवस कोरोनाच्या लक्षणांवर अधिक लक्ष दिलं जात आहे. जेणेकरून डॉक्टरांची मदत घेता येऊ शकेल.''9 / 9सुरूवातीला फ्लू प्रमाणे लक्षणं दिसून येतात. थकवा येणं, डोकेदुखी, ताप, थंडी वाजणं त्यानंतर पोटात दुखणं, चक्कर येणं किंवा उलटीसारखं होणं अशी लक्षणं दिसून येतात. १५ दिवसांनंतर १५ दिवस हाय आणि लो ब्लड प्रेशर, हार्ट रेट वाढणं, बेशुद्ध होणं अशी स्थिती उद्भवते आणखी वाचा Subscribe to Notifications