शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: डेल्टा प्लसच नाही तर कोरोनाचे हे आठ व्हेरिएंट्ससुद्धा आहेत खूप धोकादायक, असं आहे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 4:04 PM

1 / 8
गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. हा कोरोना विषाणू म्युटेट होऊन विकसित होऊ लागतो. त्यामुळे एक नवा व्हेरिएंट तयार होतो. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा एक विषाणू रेप्लिकेट होतो तेव्हा तो स्वत:ची कॉपी करू लागतो. विषाणूमध्ये होणाऱ्या या बदलाला म्युटेशन म्हणतात. कोरोनाच्या हल्लीच म्युटेट झालेल्या डेल्टा व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. आता एक नवीन स्ट्रेन डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये म्युटेट झाला आहे. तो खूपच अधिक संसर्गजन्य आहे.
2 / 8
मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटशिवाय कोरोनाचे अनेक अजून असे व्हेरिएंट आहेत. जे या विषाणूच्या ओरिजनल स्ट्रेनपेक्षा अधिक धोकादायक आहेत. आता आरोग्य तज्ज्ञांनी डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटशिवाय कोरोना विषाणूच्या अनेक नव्या व्हेरिएंटनां सुचीबद्ध केले आहे.
3 / 8
द लम्बडा व्हेरिएंट - कोरोनाचा लम्बडा व्हेरिएंट सर्वप्रथम ऑगस्ट २०२०मध्ये पेरूमध्ये दिसून आला होता. हा व्हेरिएंट आतापर्यंत सुमारे २९ देशांमध्ये पसरला आहे. पीएचईने लम्बडा व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्टच्या रूपात लिस्टेड केले आहे.
4 / 8
कप्पा व्हेरिएंट - SARS-COV-2 विषाणूला कप्पा व्हेरिएंट पँगो लिनिएज बी.१.६१७ च्या तीन सब-लिनिएजमधील एक आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात डिसेंबर २०२० मध्ये सापडला होता. हा E484Q आणि E484K चा डबल म्युटेशन व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट L452R म्युटेशनसोबत येतो. ज्याच्या मदतीने हा विषाणू इम्युनच्या सुरक्षा कवचाला चकवा देतो.
5 / 8
बी.११.३१८ - कोरोनाचा B.11.318 व्हेरिएंटमध्ये कप्पा व्हेरिएंटप्रमाणे E484K म्युटेशन होते. भारतामध्ये या नव्या व्हेरिएंटचे दोन जीनोम सिक्वेंसिस रिपोर्ट झाले आहेत. हा विषाणू खूप वेगाने लोकांना बाधित करतो.
6 / 8
बी.१.६१७.३ - बी.१.६१७ पासून तयार झालेला बी.१.६१७.३ हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंट बी,१.६१७.२ चाच एक भाग आहे. भारतात कोरोनामुळे झालेल्या हानीसाठी तोच कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. बी.१.६१७.३ पासून होणाऱ्या धोक्याची जाणीव झाल्याने तज्ज्ञांनी त्याची व्हेरिेएंट ऑफ कन्सर्न म्हणून नोंद केली आहे.
7 / 8
दक्षिण आफ्रिकेतील बी.१.३५१ व्हेरिेएंट - दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाच्या फैलावास कारणीभूत ठरलेला बी.१.३५१ व्हेरिएंट हा ऑगस्ट २०२० मध्ये सापडला होता. हा व्हेरिएंट आतापर्यंत ७५ पेक्षा अधिक पसरला आहे. डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे हासुद्धा खूप वेगाने पसरतो. तो कुठल्याही व्यक्तीला गंभीर आजारी पाडू शकतो. तसेच त्यामध्ये रीइंफेक्शनचा धोकाही अधिक असतो.
8 / 8
जपान/ब्राझील बी.१.१.२८.१ व्हेरिएंट - डिसेंबर २०२० मध्ये मिळालेला कोरोनाचा हा व्हेरिएंटसुद्धा खूप संसर्गजन्या आहे. याच्या गंभीरतेबाबत तज्ज्ञ अद्याप संशोधन करत आहेत. रीइंफेक्शनसाठी या व्हेरिएंटला जबाबदार मानले जाऊ शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय