Coronavirus: Number of People Living with Hypertension has Doubled to 1.28 Billion since 1990 Study
कोरोनासोबत ‘या’ ‘सायलेंट किलर’च्या विळख्यात अडकले लाखो लोक; रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 2:02 PM1 / 10संपूर्ण जगात लाखो लोकं अशा स्थितीत जगत आहेत जी कधीही त्यांचा जीव घेऊ शकते. इतकचं नाही तर या स्थितीबाबत ते स्वत: अज्ञात आहेत. ‘द लेसेंट’च्या नव्या स्टडीत हा खुलासा झाला आहे. ‘हायपरटेंशन’ हा एक असा आजार आहे जो सायलेंट किलरसारखा आहे. 2 / 10स्टडीनुसार, मागील ३० वर्षात हायपरटेंशन आजार असलेले अर्ध्याहून अधिक लोकांनी त्यांच्यावर उपचार केले नाहीत. ज्यामुळे अशा लोकांसाठी त्यांना जीवघेणंही ठरू शकतं. 3 / 10हाय ब्लड प्रेशर एक अशी समस्या आहेत जी सर्वसामान्य आहे. सहजपणे त्याच्यावर उपचार करून बरं होता येते. परंतु या आजाराबद्दल न समजणं आणि ते कंटोलमध्ये न ठेवणं हे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे स्ट्रोक, ह्दय आणि किडनीशी निगडीत आजारांचा धोका बनण्याची शक्यता आहे. 4 / 10या ग्लोबल स्टडीत मागील ३ दशकात १८४ देशांमधील १० कोटीपेक्षा अधिक लोकांच्या ब्लड प्रेशरचं मूल्यमापन करण्यात आले. जगभरातील हायपरटेंशन असलेल्या निम्म्या लोकांना या आजाराबद्दल माहिती नाही. तर अर्ध्याहून जास्त पुरुष आणि महिलांना माहिती असूनही त्यांनी उपचार केले नाहीत. 5 / 10इंपीरियल कॉलेज लंडनचे प्रोफेसर आणि स्टडीचे लेखक माजिद इज्जती यांनी द सनला सांगितले की, मागील काही दशकात आरोग्य क्षेत्रात इतकी प्रगती झाल्यानंतरही हायपरटेंशन सांभाळणं खूप कमी प्रमाणात सुरु आहे. हायपरटेंशनवाले बहुतांश लोक स्वत:वर उपचार करत नाहीत. मध्यमवर्गीय देशांना त्याचं मोठं नुकसान सहन करावं लागतं. 6 / 10प्रोफेसर माजिद म्हणतात की, आमच्या विश्लेषणात उच्च मध्यम उत्पन्न असणारे देश हायपरटेंशनबाबत सतर्क आहेत असं आढळलं. वेळीच या आजारावर उपचार केले जातात. यामुळे हाय ब्लड प्रेशर रोखणं, ते शरीरात आढळणं आणि त्यावर उपचार करणं शक्य आहे. यापासून निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत जागतिक स्तरावर चर्चा झाली पाहिजे. 7 / 10जगभरातील हायपरटेंशन आजारासह राहणाऱ्या लोकांची संख्या वय वर्ष ३० ते ७९ दरम्यान मागील ३० वर्षात दुप्पटीनं वाढली आहे. ब्लड प्रेशर खूप जास्त वाढल्याला हायपरटेंशन म्हंटल जातं. या स्थितीत ह्दय आणि शरीरातील नसांवर दबाव पडतो. त्यामुळे हार्ट अर्टक आणि स्ट्रोक येऊ शकतो. प्रचंड डोकेदुखी, खूप जास्त थकवा, डोळे दुखतात आणि छातीत दुखणे ही सर्वसामान्य लक्षणं आहेत. 8 / 10हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. ह्दयाचे ठोके अनियमित होतात. यूरीनमधून रक्त येते आणि छातीत, कानामध्ये वेदना होण्याची शक्यता असते. जर तुम्हालाही यातील कोणतेही लक्षण जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरीत तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा9 / 10जर तुम्ही ६५ वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल. तुमचं वजन जास्त आहे. तुम्ही व्यायाम कमी करता. कुटुंबात याआधी ब्लड प्रेशरचा त्रास असेल. तर तुम्हाला हायपरटेंशन होण्याचा धोका अधिक आहे. व्यायाम, नियमित जेवण, वजन कमी करणे यामुळे धोका कमी केला जाऊ शकतो. अशास्थितीत डॉक्टर्स स्मोकिंग बंद करणे आणि अल्कहोल बिल्कुल कमी करण्याचा सल्ला देतात. 10 / 10संपूर्ण जगात हाय ब्लड प्रेशरमुळे लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ब्लेड प्रेशर कमी करण्यानं स्ट्रोक ३५-४० टक्के, ह्दयविकाराचे झटका २०-२५ टक्के आणि ह्दयाचे ठोके बंद पडणे जवळपास ५० टक्के कमी केले जाऊ शकतं. आणखी वाचा Subscribe to Notifications