शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : शरीराच्या 'या' अवयवाला कोरोनाचा सर्वात जास्त धोका, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 11:17 AM

1 / 9
कोरोना व्हायरस आल्यापासून लोकांना सतत मास्क घालण्याचा, सतत हात धुण्याचा आणि सोशल डिस्टंसिंग ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. काही लोक तर सरफेसला स्पर्श होऊ नये म्हणून थेट ग्लव्सही वापरत आहेत.
2 / 9
व्हायरसपासून बचावासाठी पुन्हा पुन्हा हाताने नाक, डोळे आणि तोंडाला स्पर्श न करण्याचा सल्ला दिला जात आहे. पण हे सगळं करूनही आपल्या शरीराचा एक भाग सतत उघडा राहतो आणि हाच भाग व्हायरसच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त आहे.
3 / 9
शरीराचा हा अवयव आहे डोळे. डोळ्यांची सुरक्षा तेवढीच गरजेची आहे जेवढी नाक आणि तोडांची आहे. कोरोना व्हायरस केसमध्ये डोळ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाक आणि तोंडाप्रमाणे डोळ्यांचीही काळजी घ्यावी.
4 / 9
द लॅंसेट जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्यांची सुरक्षा करणे हे पुढील मोठं पाउल असू शकतं. हा निष्कर्ष 16 देशांतील लोकांवर करण्यात आलेल्या 170 स्टडीजच्या विश्लेषणावर आधारित आहे.
5 / 9
जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटी द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये याबाबत माहिती देण्यात आली की, कोरोना व्हायरस डोळ्यांद्वारेही पसरू शकतो. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, डोळ्यांची सुरक्षा करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं नाक आणि तोंडाची करणं.
6 / 9
रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जर एखादा कोरोनाने संक्रमित व्यक्ती तुमच्याजवळ शिंकतो किंवा खोकतो तेव्हा त्याच्या नाका-तोंडातून निघालेले ड्रॉपलेट्स डोळ्यांच्या माध्यमातून कोशिकांवर हल्ला करू शकतता. नाक आणि तोंडाप्रमाणेच डोळ्यांची काळजी घेतली तर कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो.
7 / 9
द लॅंसेटने डोळ्यांच्या सुरक्षेसाठी व्हाइजर, फेस शील्ड, गॉगल्स किंवा मोठे चष्मे घालण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑप्थल्मोलॉजीनुसार, करेक्टिव लेंस किंवा उन्हाला चष्मा संक्रमित ड्रॉपलेट्सपासून तुमच्या डोळ्यांना वाचवू शकतात. पण तरी सुद्धा चष्म्याचे किनार, वरच्या आणि खालच्या बाजूने गॅप राहत असल्याने डोळ्यांपर्यंत व्हायरस पोहोचू शकतो.
8 / 9
जसे तुम्ही तुमचा मास्क स्वच्छ करता तसेच डोळ्यांची सुरक्षा करण्यासाठी वापरलेल्या वस्तूही स्वच्छ करा. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्वच्छ करणे तेवढंच महत्वाचं आहे जेवढं त्या वापरणे.
9 / 9
जसे तुम्ही तुमचा मास्क स्वच्छ करता तसेच डोळ्यांची सुरक्षा करण्यासाठी वापरलेल्या वस्तूही स्वच्छ करा. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्वच्छ करणे तेवढंच महत्वाचं आहे जेवढं त्या वापरणे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealthआरोग्य