coronavirus over 300 omicron subvariants circulating know 7 symptoms to identify new strains
CoronaVirus News : कोरोनाने बदलली खूप रुपं, व्हेरिएंटसह लक्षणांमध्येही झाला बदल; 'हे' आहेत नवीन Symptoms By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 12:39 PM1 / 10कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. सातत्याने नवनवीन व्हेरिएंट येत असल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमायक्रॉनचा आणखी एक सबव्हेरिएंट XBB आणि XBB1 समोर आली आहे. जगभरात ओमायक्रॉनचा प्रकोप वाढताना दिसत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या चीफ सायंटिस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी XBB मुळे अनेक देशांत नवी लाट येऊ शकते असं म्हटलं आहे. 2 / 10ब्रिटन, अमेरिका आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. चीनमधील अनेक शहरांत पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. भारतातील अनेक राज्यात हा व्हेरिएंट सापडला आहे. गेल्या वर्षी हिवाळ्यात कोविड-19 चे ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यापासून कोरोनाविरूद्धच्या लढाईचा प्लॅन बदलला आहे. 3 / 10कोरोच्या जुन्या व्हेरिएंटच्या तुलनेत या प्रकारामुळे फारसा त्रास होत नसला तरी चिंतेची बाब आहे की ते खूप वेगाने पसरतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अलीकडेच अहवाल दिला आहे की सध्या Omicron प्रकारांचे 300 हून अधिक सबव्हेरिएंट जगभरात पसरलेले आहेत. यापैकी 95% BA.5 sublineages आहेत, तर 20% BQ.1 sublineages आहेत.4 / 10Omicron आल्यानंतर कोरोना व्हायरस संसर्गाशी संबंधित लक्षणे देखील बदलली आहेत. त्यामुळे अनेक प्रकारांच्या सबव्हेरिएंटमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत हे कसे ओळखायचे हा प्रश्न आहे. चव न कळणं आणि वास न येणं यावरून आधी ओळखता यायचं पण आता तेही सूचक नाही. 5 / 10Omicron सह लक्षणे देखील बदलली आहेत आणि संसर्गाचे 'सामान्य' लक्षण आता खोकला आहे, जो दीर्घकाळ खोकला किंवा ब्राँकायटिस बनतो. याशिवाय, थकवा हे देखील एक लक्षण आहे, जे इतके जलद आहे की संक्रमित व्यक्ती आपले दैनंदिन काम करू शकत नाही. डोकेदुखी, ताप, नाक वाहणे, घसा खवखवणे असं असून जे अनेकदा वेदनादायक होते.6 / 10अन्न गिळण्यास त्रास होणं आणि स्नायू दुखणं ही आता मुख्य लक्षणं आहेत. भारतातील अनेक राज्यात Omicron, XXB आणि BQ.1 चे नवीन प्रकार नोंदवत आहेत, परंतु त्यांना कोरोना व्हायरस संसर्ग आणि रुग्णालयात दाखल करण्यात येणारे रुग्ण यात कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही.7 / 10मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू यांनी सांगितले की, नवीन स्वरूपाच्या रूग्णांमध्ये ही लक्षणे फारशी दिसून आली नाहीत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, त्यांनी सांगितले की, 'अनेक लोकांना चुकून कोविड-19 ची लागण झाली आहे. 8 / 10एखादी व्यक्ती ही इतर आरोग्यविषयक समस्यांसाठी रुग्णालयात गेली आणि त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली असं म्हटलं आहे. कोविड-19 च्या सुरुवातीच्या टप्प्यात संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वास कमी होणे, चव कमी होणे यासारखी लक्षणे ठळकपणे दिसून आली, परंतु सध्याच्या रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसत नाहीत. 9 / 10बर्याच रुग्णांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो, म्हणून ते घरी उपचार करतात आणि चाचण्यांसाठी जात नाहीत. डॉ. लक्ष्मण जेसानी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील संसर्गजन्य रोगांचे सल्लागार, म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आणि ICU मध्ये दाखल होण्याची शक्यता कमी आहे, कारण संसर्ग बहुतेक सौम्य असतात. 10 / 10कोरोनाच्या संकटात मास्क लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, कोरोना नियमावलीचं पालन करा असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications