Coronavirus: Oxford University-Astrazeneca Status Moderna Enters Decisive Trial
Coronavirus: ‘या’ ठिकाणी कोरोना लसीच्या अंतिम टप्प्याची चाचणी सुरु; लवकरच लोकांना उपलब्ध होणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 8:40 AM1 / 10कोरोना विषाणूच्या लसीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी यूकेच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून येऊ शकते. विद्यापीठ लसीच्या सुरुवातीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा जाहीर करणार आहे. 2 / 10आतापर्यंतच्या प्रगतीत सर्वात पुढे असणाऱ्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी-अॅस्ट्रॅजेनेकाची लस मिळविण्यासाठी बऱ्याच देशांनी आधीच करार केला आहे. दुसरीकडे, अमेरिकन कंपनी मॉडर्ना देखील क्लिनिकल चाचणीचा शेवटचा टप्पा सुरू करणार आहे. 3 / 10चीनच्या २ लसीची वेगवेगळ्या देशात तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरु आहे. भारतात बनत असलेल्या Covaxin आणि Zycov-D या दोन कोरोना लसीवर मानवी चाचण्याही सुरू आहेत. 4 / 10याव्यतिरिक्त, बर्याच भारतीय कंपन्यांचा वेगवेगळ्या देशांमध्ये लसीच्या चाचण्यांमध्ये समाविष्ट आहे. अमेरिकन कंपनी मॉडर्नाची कोविड -१९ लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 5 / 10अलीकडील अभ्यासामध्ये, लसीने क्लिनिकल चाचण्यांमध्ये चांगले परिणाम दिले आहेत. पहिल्या टप्प्यात सर्व ४५ व्यक्तींमध्ये अँटीबॉडीज तयार करण्यात आले. फेज ३ चाचणीमध्ये ३० हजार रुग्णांचा समावेश असेल, यातील अर्ध्यांना १०० मायक्रोग्राम डोस दिले जातील तर बाकींना प्लेसीबो दिलं जाईल. 6 / 10Clinicaltrials.gov नुसार ही अभ्यास चाचणी २७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालेल. मॉडर्नाची लस ही जगातील सर्वात प्रगत लसींपैकी एक आहे.7 / 10बांग्लादेश मेडिकल रिसर्च कौन्सिलने (बीएमआरसी) चिनी कंपनीने बनविलेल्या कोविड लसीच्या फेज ३ च्या चाचणीस मान्यता दिली आहे. सात रुग्णालयांमध्ये ऑगस्ट महिन्यांपासून चाचणी सुरू होईल. 8 / 10सिनोव्हॅक रिसर्च एँण्ड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड या चिनी कंपनीने ४२०० आरोग्य कर्मचारी तयार केले आहेत. त्यांची फेज १ आणि २ चाचण्या चीनमध्ये घेण्यात आल्या आहेत. 9 / 10रशियाच्या लसीने चाचणीच्या स्पर्धेत बाजी मारल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता तेथील आरोग्यमंत्र्यांनी असं म्हटले आहे की, तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी होण्यापूर्वीच ते ही लस लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. 10 / 10रशिया दोन प्रकारची लसीची फेज ३ मधील चाचणी ३ ऑगस्टपासून रशिया तसेच युएईमध्ये सुरू होणार आहे. भारतातही कमीत कमी ७ कंपन्या कोरोनावरील लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications