CoronaVirus News: कोरोनाचे बहुतांश रुग्ण करतात 'या' चुका; प्रकृती आणखी बिघडण्याचा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 3:18 PM
1 / 11 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला आहे. नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढला असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. 2 / 11 गेल्या २४ तासांत देशात जवळपास ३ लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर २ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांनी जीव गमावला. 3 / 11 कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काही जण पेनकिलर्स आणि एँटीबायोटिक्स घेत आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्लाशिवाय अशी औषधं घेणं धोकादायक ठरू शकतं. 4 / 11 कोरोनाची लागण झाल्यावर अनेक जण घाबरून जातात. रुग्णालयांमध्ये बेडसाठी शोधाशोध सुरू होते. मात्र सौम्य लक्षणं असल्यास घरीच कोरोनावर उपचार शक्य आहेत. एखाद्या आजारानं ग्रस्त असलेल्यांनी आणि वृद्धांनी रुग्णालयात जायला हवं. 5 / 11 सेल्फ आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानं पॅरासिटोमॉल आणि इबुप्रोफेनसारखी औषधं घेऊ शकतात. साधारणत: डॉक्टर कॉम्बिफ्लेम आणि फ्लेक्सॉन सारखी औषधं घेण्यास सांगतात. यामध्ये पॅरासिटोमॉल आणि इबुप्रोफेनचा वापर होतो. 6 / 11 कोरोनामध्ये अनेकांना खोकला येतो. त्यावर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं खोकल्यावरील औषध किंवा कफ सिरप घेऊ शकता. जर तुम्ही पॅरासिटोमॉल आणि इबुप्रोफेनचं कॉम्बिनेशन घेतलं असेल तर याच्या ओव्हरडोसमुळे नुकसान होऊ शकतं. 7 / 11 एँटिबायोटिक्स औषधांनी कोरोनावर उपचार करणं योग्य नाही. एँटिबायोटिक्स कोरोना विषाणूविरोधात प्रभावी नाहीत. अँटीबॅक्टेरियल हँडवॉशदेखील पृष्ठभागावरील विषाणू नष्ट करण्यात परिणामकारक ठरत नाहीत. त्याऐवजी अल्कोहोलचं प्रमाण ६० टक्के असलेल्या सॅनिटायझर्सचा वापर करावा. 8 / 11 कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काही जण आयुर्वेदिक किंवा पारंपारिक औषधांचा वापर करतात. या औषधांना शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे अशा औषधांचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या. 9 / 11 शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाण्याचं आणि फायबरचं प्रमाण जास्त असलेली फळं खा. 10 / 11 जास्त कॅलरी असलेलं अन्न खाण्याच्याऐवजी जास्त फायबर असलेलं अन्न खा. फायबरचं प्रमाण अधिक असलेली फळं आणि त्यांचा रस घ्या. 11 / 11 सॅच्युरेटेड फॅट्स आणि साखरेचं प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाऊ नका. याचा थेट परिणाम बीएमआयवर होतो. गेल्या वर्षी मृत्यू पावलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण बीएमआय अधिक असलेल्यांचं होतं. आणखी वाचा