शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनामुक्त रुग्णांना जीवघेण्या 'गुलियन बेरी सिंड्रोम'चा धोका; जाणून घ्या लक्षणं

By कुणाल गवाणकर | Published: December 25, 2020 9:21 AM

1 / 10
जगातील कोरोना रुग्णांचा आकडा ८ कोटींच्या जवळ पोहोचला आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १७ लाखांच्या पुढे गेला आहे.
2 / 10
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.
3 / 10
देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली आहे. यातील ९७ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे.
4 / 10
कोरोनामुक्त झालेल्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये कोरोनावर मात केलेल्या १० जणांमध्ये 'गुलियन बेरी सिंड्रोम'ची लक्षणं दिसून आली आहेत. यामुळे रुग्णांना अर्धांगवायूचा त्रास होतो.
5 / 10
गुलियन बेरी सिंड्रोम एक गंभीर स्वरुपाचा आजार आहे. विषाणूची लागण झाल्यानंतर हा आजार होतो. मात्र हा आजार एका व्यक्तीच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही.
6 / 10
गुलियन बेरी सिंड्रोम दुर्मिळ आजार आहे. तो एक लाखामागे एका व्यक्तीला होतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना गुलियन बेरी सिंड्रोम होण्याची शक्यता अधिक असते.
7 / 10
प्लाझ्मा फोरेसिस मशीनच्या माध्यमातून गुलियन बेरी सिंड्रोमवर उपचार केले जातात. योग्य वेळी उपचार न झाल्यास रुग्णाचा जीवदेखील जाऊ शकतो.
8 / 10
गुलियन बेरी सिंड्रोमचा त्रास सुरू झाल्यावर सुरुवातीला हात, पायांमध्ये कमजोरी जाणवू लागते. त्यानंतर हळूहळू कंबर, खांदे दुखू लागतात.
9 / 10
गुलियन बेरी सिंड्रोमचा त्रास वाढल्यास श्वास घेण्यात अडचणी येतात. रुग्णाला पाच-दिवस रोज एक इंट्राविनस इम्युनोग्लोबिलिन इंजेक्शन दिलं जातं. त्याची किंमत अतिशय जास्त आहे.
10 / 10
दररोज व्यायाम, योग केल्यास, चालल्यास, पौष्टिक आहार घेतल्यास गुलियन बेरी सिंड्रोमपासून बचाव करता येतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या